मृत्यू योग – Marathi Horror Story
मृत्यू योग – Marathi Horror Story फोन ची रिंग वाजली. “अरे यार इतक्या सकाळी कोण फोन करतेय” झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळा नंतर मला जाग आली तसे मी लगेच माझा मोबाईल पहिला. माझ्या मित्राचे म्हणजेच शिवमचे चार पाच मिस्ड कॉल आले होते. तो सहसा असा फोन करत नाही पण काही तरी अर्जंट असावे म्हणून मी पटकन त्याला कॉल बॅक केला आणि कळले की माझा नेट पॅक च संपलाय. माझ्या बाबतीत नेहमी असेच घडते. नेमका आताच मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावतच जाऊन घरातल्या लँडलाईन वरून शिवम ला फोन लावला. मी काही बोलणार तोच तो म्हणाला “हरेश लवकर आपल्या स्टँड वर ये, एम. जे. एम. हॉस्पिटल ला जायचंय”.. ते नाव ऐकून शरीरातून विजेची लहर जावी अशी क्षणीक भीती निर्माण झाली. तुम्हाला वाटेल हॉस्पिटलचे नाव ऐकून घाबरण्यासारखे काय आहे. पण गेल्या काही दिवसात जे काही घडत होतं आणि ऐकायला मिळत होत त्यावरून भीती वाटणं साहजिक होत. काही महिन्यांपासून त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बऱ्याच माणसांचा मृत्यू झाला होता. कारण काहीही असले तरी मृत्यू झालेल्या माणसाची छाती फाडलेली असायची व त्याचे हृदयच नसायचे. अजूनही कळले न