Posts

Showing posts with the label marathi ghost blogs

भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा

Image
 भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा  साधारण दोन वर्षापूर्वी मे महिन्यात मी आणि माझ्या मामाचा मुलगा सिनेमा पाहून रात्री साधारण बारा वाजता घरी येत होतो.. पोर्णिमा होती त्यारात्री.... आमच्या मामाच्या area मध्ये आल्यावर अचानक गार वार सुटला . एवढ्या वाऱ्यात गाडी चालवण जरा धोक्याचाच..म्हणून आम्ही थांबायचा विचार केला . आमच्या मामाच्या area मध्ये जुना वाडा आहे. तो ३० वर्षापासून बंद आहे . आम्ही तिथे बाईक लाऊन बसलो .. त्या वाड्यातून आम्हाला एक बाई येताना दिसली.. तिने पांढरी साडी घातलेली.. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यातून रक्त येत होत. तिच्या डोक्यावर केस नव्हते. ती संपूर्ण टकली होती.. तिचा हा अवतार पाहून आमची जरा टरकलीच ... ती आमच्याकडे पाहून विचित्र हसली..आम्ही खुप घाबरलो. आम्ही बाईक स्टार्ट केली, आणि तिथून पळ काढला. ती आमच्या मागे पाळायला लागली . आम्ही आमची Pulsar full speed वर पळवली . तरीही त्या बाईचा वेग जवळ जवळ आमच्या इतकाच होता.. आम्ही खूप घाबरलो.. त्या स्त्रीने आमच्या घराच्या फाटकापर्यंत आमचा पाठलाग केला.. आणि फाटकावर येउन ती थांबली.. ...

“अतृप्त आत्मा “ गावाकडच्या भुताच्या गोष्टी

Image
“अतृप्त आत्मा “  गावाकडच्या भुताच्या गोष्टी  Marathi Suspense Stories रुपाली…!! खूप आवडायची मला. ते वयच तसं होत अन ती होतीच इतकी सुंदर कि मला काय, आख्ख्या वर्गाला ती आवडायची. आवडण्यासारखीच होती ती काळेभोर डोळे, जणू प्रेमाचा अथांग डोह. एक वेगळच तेज असायचं त्या डोळ्यांत. लांब सडक केस..!! तीनं त्यांना जणू वाऱ्यावर सोडून दिलं असावं, तरीही ते बिचारे, तिच्याशी ईमान राखून असायचे.सरळसोट, सिल्की आणि शाईन,चेहर्यावर पुढं पुढं करणार्या बटा…!! आपल्या नाजूक हातांनी त्या सावरण्यात, तीचे दिवसातले चोवीस ताससुद्धा खर्ची पडत. लांब नाक…! गोरा रंग…! आणि प्रसन्न चेहरा…!! सदैव ओळखीचं हसू दाखवणारा, नाईन्टीजमधली नीलम आठवतेय का हो तुम्हाला बस..!! अगदी तशीच दिसायची. तिच्या या मोहक अदांनी साहजिकच त्यावेळी चिपळूणमध्ये हार्ट पेशंटची संख्या वाढलेली होती, तरीही.. तिची अन माझी ओळख, निदान तोंडओळख तरी रहायला हवी. अर्थात याउप्पर मला दुसरं काही परवडण्यासारखंही नव्हतं म्हणा. खरं तर आम्ही त्यांचे भाडेकरू. नव्या भैरीच्या पल्याड, त्यांचा एक मोठ्ठा बंगला होता. ant मागच्या बाजूला आऊटहाऊसमधे दोन खोल्या, तिथेच रहायचो आम्...