Posts

Showing posts with the label ghost stories

मृत्यू योग – Marathi Horror Story

Image
 मृत्यू योग – Marathi Horror Story   फोन ची रिंग वाजली. “अरे यार इतक्या सकाळी कोण फोन करतेय” झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळा नंतर मला जाग आली तसे मी लगेच माझा मोबाईल पहिला. माझ्या मित्राचे म्हणजेच शिवमचे चार पाच मिस्ड कॉल आले होते. तो सहसा असा फोन करत नाही पण काही तरी अर्जंट असावे म्हणून मी पटकन त्याला कॉल बॅक केला आणि कळले की माझा नेट पॅक च संपलाय. माझ्या बाबतीत नेहमी असेच घडते. नेमका आताच मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावतच जाऊन घरातल्या लँडलाईन वरून शिवम ला फोन लावला. मी काही बोलणार तोच तो म्हणाला “हरेश लवकर आपल्या स्टँड वर ये, एम. जे. एम. हॉस्पिटल ला जायचंय”.. ते नाव ऐकून शरीरातून विजेची लहर जावी अशी क्षणीक भीती निर्माण झाली. तुम्हाला वाटेल हॉस्पिटलचे नाव ऐकून घाबरण्यासारखे काय आहे. पण गेल्या काही दिवसात जे काही घडत होतं आणि ऐकायला मिळत होत त्यावरून भीती वाटणं साहजिक होत. काही महिन्यांपासून त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बऱ्याच माणसांचा मृत्यू झाला होता. कारण काहीही असले तरी मृत्यू झालेल्या माणसाची छाती फाडलेली असायची व त्याचे हृदयच नसायचे. ...

एक सत्य घटना : Marathi Bhay Katha

Image
Marathi Bhay Katha : एक सत्य घटना  आदिती पराड़कर यांचा हां लेख आहे ........ मुंबई ही स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते. कारण इथे अनेकांची स्वप्नं सत्यात उतरतात. मात्र नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे हिला एक काळी किनारही आहे. म्हणजे ज्या प्रमाणे अनेकांची चांगली स्वप्नं सत्यात उतरतात त्याप्रमाणे कित्येकांची वाईट स्वप्नंदेखील खरी होतात, कित्येकदा अफवादेखील पसरतात. या अफवांतूनच मुंबईतल्या काही भीतीदायक किंवा भयानक जागांचा जन्म झाला आहे. अशा जागा कोणत्या याची आपण ओळख करून घेऊया. मुंबईतल्या चर्चगेट किंवा फोर्टच्या परिसरात कित्येक  कार्यालयं आहेत. बहुतांश कार्यालयं ही ब्रिटिशकालीन इमारतीत आहेत. त्यामुळे संध्याकाळी सातनंतर कार्यालयीन वेळ संपल्यावर या परिसरात शुकशुकाटच असतो. त्यानंतर ब्रिटिशकालीन इमारतींचं रूप भयानक दिसू लागतं. त्यापैकी बॉम्बे हायकोर्टाच्या इमारतीत एक द्विभाषिक भुताचा वास्तव्य असल्याचं मानलं जातं. रात्रीच्या वेळी म्हणे तिथे टाइपरायटर वाजल्याचा आवाज येतो. गेट वे समोरच्या पंचतारांकित ‘ताजमहाल’ हॉटेलच्या बाबतीत अशी आख्यायिका सांगितली जाते की, हॉटेल बांधून झाल्यावर त्या हॉ...

असे काय घडले त्या रात्री रोहिणी सोबत...

Image
* ती काळरात्र * Real Ghost Stories in Marathi ओह ! शीट !! गाडीला पण बंद पडायला आताच मुहूर्त मिळाला. रोहिणी चिडून स्वतःशीच बोलली.  रोहिणी एका प्रसिद्ध मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करीत होती. एकदम मॉडर्न विचारांची, बिनधास्त २८ -२९ ची तरुणी. स्वतःचा ४ रूम चा प्रशस्त ब्लॉक. आई वडील, लहान भाऊ आणि लहान बहीण गावी राहत होते. गावावरून आईने पाठवली राधा मावशी बरोबर ती राहत होती. मॉडर्न असल्यामुळे दारू, स्मोकिंग पार्ट्या तिला निषिद्ध नव्हते. किंबहुना आवड होती. पब मध्ये जाणे येणे होते. अशी हि रोहिणी काही अर्जंट कामासाठी मुंबई वरून गावी चाललेली आता चांगलीच वैतागलेली होती. शुक्रवारी रात्री निघून, रविवारी रात्री परत येण्याचा तिचा विचार होता. आता पर्यंत ती अशी बऱ्याच वेळा जाऊन आलेली. तशीच ती आज पण निघाली. पण आज सुरवाती पासूनच तिला नाट लागली. अगं ! आज रात्रीची नको निघूस. आज अमावस्या चालू झाली आहे. उद्या सकाळी निघ. राधामावशी पहिली आडवी आली. काही नाही होत अमावास्येला निघून. सगळे थोतांड आहे. माझा नाही विश्वास, असे म्हणून रोहिणी निघाली. घाई गडबडीत मोबाईल घरी विसरली. परत लिफ्टने वर य...

एक भयाण स्वप्न कि सत्य ?

Image
एक भयाण स्वप्न कि सत्य ?  कधी कधी असं वाटतं कि खरंच  भूत, आत्मा असे जे काही लोकांच्या अनुभवांवरून ऐकायला मिळत हे सगळं खरं असत ?  आता हेच पहा माझा संभाजी नावाचा मित्र आहे त्याला पडलेलं स्वप्न तुम्हाला सांगतो....  संभाजी नेहमी प्रमाणे रात्री जेवण करून जोपण्याचा प्रयत्न्य करत होता पण मात्र जोपच त्याला येत न्हवती, मग त्याने असा विचार केला कि घराच्या बाहेर चालत जाऊन फेर फटका मारावा...  थंडीचे दिवस असल्यामुळे गारठा खूप होता आणि चालताना समोरचं दृश्य काहीचं दिवस न्हवत आणि अचानक उजव्या काना जवळून छनं छनं असा आवाज आला. अचानक हा आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी त्याने आजू बाजूला पाहिले पण काहीच दिसत न्हवत.  अखेर त्याने घरी जायचा विचार केला, रात्री १च्या सुमारास संभाजी गाढ झोपी गेला आणि सुमारे सकाळी ६ च्या दरम्यान त्याने एक भयानक असं स्वप्न पाहिलं.  त्या स्वप्नात त्याला एक पांढरी साडी नेसलेली सुंदर अशी तरुणी दिसली, ती तरुणी चक्क त्याच्याच घरात आली होती आणि स्वयंपाक गृहात जाण्याचा प्रयत्न्य करताच श्यनी संभाजीने तिला टोकले, आणि व...