Posts

Showing posts with the label bhootanchya satya katha

एक होती चेटकीण...

Image
  एक होती चेटकीण- Marathi Ghost Stories  यात तिचा काही दोष नव्हता, असंच कुणालाही वाटलं असतं. पण तिचे हात रक्ताने माखलेले होते. तिच्या ओठांवर पसरलेलं रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या ड्रॅक्यूला प्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा. तिचा तो अवतार भयाण असाच होता. पोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं. तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचा थरकाप उडाला असता. ही दहा वर्षांची चिमुरडी एखाद्या चेटकीणी सारखी भासत होती. तिची नजर अगदी स्तब्ध होती. महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण ती हू नाही की चू नाही. केवळ शून्यात पाहत होती. काय घडलं असेल आदल्या रात्री? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. तिचं नाव शाल्मली. अनूज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या. सविताने शाल्मलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेली नाही. कसंबसं तिने दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला. शाल्मली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे. पण ती शारीरिक आणि मानसिक रितीने सुदृढ आहे, असं डॉक्टरांचं म्ह...

भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा

Image
 भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा  साधारण दोन वर्षापूर्वी मे महिन्यात मी आणि माझ्या मामाचा मुलगा सिनेमा पाहून रात्री साधारण बारा वाजता घरी येत होतो.. पोर्णिमा होती त्यारात्री.... आमच्या मामाच्या area मध्ये आल्यावर अचानक गार वार सुटला . एवढ्या वाऱ्यात गाडी चालवण जरा धोक्याचाच..म्हणून आम्ही थांबायचा विचार केला . आमच्या मामाच्या area मध्ये जुना वाडा आहे. तो ३० वर्षापासून बंद आहे . आम्ही तिथे बाईक लाऊन बसलो .. त्या वाड्यातून आम्हाला एक बाई येताना दिसली.. तिने पांढरी साडी घातलेली.. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यातून रक्त येत होत. तिच्या डोक्यावर केस नव्हते. ती संपूर्ण टकली होती.. तिचा हा अवतार पाहून आमची जरा टरकलीच ... ती आमच्याकडे पाहून विचित्र हसली..आम्ही खुप घाबरलो. आम्ही बाईक स्टार्ट केली, आणि तिथून पळ काढला. ती आमच्या मागे पाळायला लागली . आम्ही आमची Pulsar full speed वर पळवली . तरीही त्या बाईचा वेग जवळ जवळ आमच्या इतकाच होता.. आम्ही खूप घाबरलो.. त्या स्त्रीने आमच्या घराच्या फाटकापर्यंत आमचा पाठलाग केला.. आणि फाटकावर येउन ती थांबली.. ...