अमावस्या आणि ती : Marathi Haunted Story
अमावस्या आणि ती लहानपणी गावी जायला सगळ्यांनाच आवडत त्यात मी एक होतो, शाळेच्या परीक्षा संपल्या कि मे महिन्यात महिनाभर गावी जायचं, उनाडायचं, बागडायचं विशेष म्हणजे रानात जायचं आंबे, जांभूळ इत्यादी फळे स्वतःच्या मेहेनतीने काढून खायला खूप गम्मत असायची. माझं खरसई हे गाव आहे म्हसळा तालुक्यात छोटंसं गाव; जिथे खूप शांतता असते. आमच्या कोळीवाड्यात तर मे महिन्यात मुंबईकरांची जत्राच असे. असं असताना एक दिवशी मला जे काही जाणवलं ते फार वाईट होत आणि विशेषता भयंकर होत. त्याच्यामुळे कि काय पण मी जवळपास ७ वर्ष गावीच गेलो नाही आहे. सुमारे २०१० साली माझी १० विची परीक्षा झाली होती आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी मी गावी जायचं ठरवलं आणि फार काही विचार न करता माझ्या आई वडिल्यांची गावी जायची मला सहमती दिली. आमच्या गावच्या घरात माझ्या आजी शिवाय बाकी कोण राहत न्हवत. आमचं घर म्हणजे काही मोठा महाल वैगेरे न्हवता पण किमान ५ ते ७ खोल्या आहेत त्यात ५ वेगळी दरवाजे आणि विशेषता रात्री जेव्हा light जायची तेव्हा फार भीती वाटायची. एकदा असच झालं, मला १२. ते १२.४५ च्या रूमारास लघवीला लागली तर मी घरच्या आवारा