अमावस्या आणि ती : Marathi Haunted Story


अमावस्या आणि ती

लहानपणी गावी जायला सगळ्यांनाच आवडत त्यात मी एक होतो, शाळेच्या परीक्षा संपल्या कि मे महिन्यात महिनाभर गावी जायचं, उनाडायचं, बागडायचं विशेष  म्हणजे रानात जायचं आंबे, जांभूळ इत्यादी फळे स्वतःच्या मेहेनतीने काढून खायला खूप गम्मत असायची. माझं खरसई हे गाव आहे म्हसळा तालुक्यात छोटंसं गाव; जिथे खूप शांतता असते. आमच्या कोळीवाड्यात तर मे महिन्यात मुंबईकरांची जत्राच असे. असं असताना एक दिवशी मला जे काही जाणवलं ते फार वाईट होत आणि विशेषता भयंकर होत. त्याच्यामुळे कि काय पण मी जवळपास ७ वर्ष गावीच गेलो नाही आहे. 

सुमारे २०१० साली माझी १० विची परीक्षा झाली होती आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी मी गावी जायचं ठरवलं आणि फार काही विचार न करता माझ्या आई वडिल्यांची गावी जायची मला सहमती दिली. आमच्या गावच्या घरात माझ्या आजी शिवाय बाकी कोण राहत न्हवत. आमचं घर म्हणजे काही मोठा महाल वैगेरे न्हवता पण किमान ५ ते ७ खोल्या आहेत त्यात ५ वेगळी दरवाजे आणि विशेषता रात्री जेव्हा light  जायची तेव्हा फार भीती वाटायची. 

एकदा असच झालं, मला १२. ते १२.४५ च्या रूमारास लघवीला लागली तर मी घरच्या आवारात जायचं ठरवलं आणि तस गेलो सुद्धा. एरवी पहाटे आवारातली झाडे झुडपे खूप सुंदर दिसत आणि आता मात्र रात्र होती मला लघवी करताना फार भीती वाटत होती, वारा खूप सुटला होता त्यात रातकिड्यांचा आवाज मला असह्य, नकोस वाटत होता. माझं लक्ष्य सारखं माघे जात होत जस कि त्या झाडांच्या माघे कोणी तरी आहे कि काय ह्याचा भास होत होता. 

मी ज्यासाठी आलो होतो ते काम माझं झालं होत तर मी घरात शिरणार इतक्यात मला कोणीतरी हाक मारण्याचा आवाज ऐकू आलं, एवढ्या रात्री आवाज कोणी दिला असेल ? कोण असेल ? त्यात स्त्रीचा आवाज होता तो, तर मी घराच्या पायऱ्या ओलांडून पुन्हा आवारात आलो तर पाहतोय तर काय.... 

अंगावर सुंदर साडी नेसलेली, केसात गजरां माळलेली, सुघंदी अत्तर लावलेली  स्त्री दिसली. तिचे ते नाजूक डोळे, सुडोल बांधा पाहून असं वाटत होत कि आता तर रात्र आहे आणि हि इथे काय करतेय. तर मी विचारलं अहो काकू तुम्ही रात्रीच्या वेळी असं का फिरत आहात. वाट चुकलात कि काय आणि हा आमचा आवर आहे ह्या आवारात काय करताय.  रस्ता चुकल्या असाल तर घरी चला माझी आजी सांघेल, सकाळी निघून जा. 

त्या वर ती स्त्री म्हणाली अरे मी ह्या गावातलीच आहे, मला मदत करशील कारे मला माझ्या घरी जायचं आहे तिथे वाटेत २ ते ३ कुत्री आहेत त्यांची भीती वाटतेय, चल ना, तर मी होकार दिला आणि तिच्या सोबत जायला लागलो. तिच्या बोलण्यानुसार तीच घर माझ्या घरापासून किमान २० मिनिटांवर होत आणि मी हि जायला तयार झालो कारण त्या बोलताना थोड्या भावुक होत होत्या. 

तर finally आम्ही दोघे आता गावच्या रस्त्यातून जात होतो, गावी घरे खूप ऐसपैस आहेत आणि कौलारू त्यातल्या त्यात काळोखातून जायला तर खूप भीती वाटत होती त्या काकू ने माझा हात पकडला, मला तेवढा थोडा धीर आला आणि बोलत बोलत जात होतो ती विचारात होती मुंबईचा पाहून आहेस का? काय करतोस ? मग आई बाबा कधी येतात गावी वैगेरे. आता माझी भीती गेली होती आणि रात्री रस्त्यातून जातोय हे पण विसरून गेलो होतो. 

चालता चालता बोलण्याच्या नादी त्या स्त्रीने मला भलत्याच वाटेने घेऊन जात होती, मी वर्षातून एकदा गावी यायचो म्हणून मलासुद्धा गावचे रस्ते पाठ न्हवते. मी त्या काकुन्हा विचारलं कि तुम्ही गावी काय करता शेती आहे कि business  वैगेरे. त्या वर उत्तर खूप भयानक मिळालं, मी काहीच करत नाही फक्त फिरत असते. थोडा वेळ दचकलो इतक्यात तीच म्हणाली कि मी सुद्धा मुंबईला असते आणि मे मद्धे गावी येते. मग पुन्हा मुंबईला काय करते वैगेरे बोलणं सुरु असताना मी आणि ती आम्ही दोघे हि गावच्या बस स्टॅन्ड ला पोचलो. माझी नजर समोरून येणाऱ्या एका व्यक्ती कडे गेली. हातात बॅग, T -शर्ट जीन्स असा पेहराव होता तो जसा जवळ आला तर कळलं कि हा तर पक्या माझ्या गावातला माझा खास मित्र. तो नुकताच ST ने गावी आला होता. त्याने मला पाहिलं आणि विचारलं नरेंद्र तू हिते एवढ्या रात्री काय करतोस ? मी सांघितलं कि ह्या काकुन्हा त्यांच्या घरी सोडायला आलो आहे.. 

बघतोय काय तर त्या काकू म्हणजे ती स्त्री माझ्या आजूबाजूला न्हवतीच, अशी कशी ती कुठे गेली ? माघे थाम्बलीये का ? ह्या विचाराने मी आणि पक्या जवळपास त्याच जागी ३० ते ४५ मिनिट्स थांबलो आणि शेवटी निघालो पण घरी जाताजाताना मनात खूप शंका आणि प्रश्न उपस्तित होत होते. एवढ्यात कुठे तरी लांबून कोणी तरी किंचाळण्याचा आवाज आला आम्ही माघे पाहिलं तर दूर एका ठिकाणी तीच स्त्री रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहीर जवळ उभी राहून किंचाळत होती. 

आता तिचा चेहरा मात्र खूप भयानक झालेला दिसला, तिचे पाय दिसत न्हवते आणि मद्धेच वाचलास वाचलास अशी बोलत होती तीच ते भयानक आणि विलक्षण रूप पाहून मी आणि पक्क्या जिवाच्या आकांताने धावत धावत गावाच्या वेशी मद्धे आलो आणि सरळ माझ्या घरी आलो, हिते माझी आजी आणि गावकरी मी कुठे रात्री गेलोय ह्या चिंतेत होते, मला पाहून गावकरी सुखावले. मी आजीला पाहताच तिला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागलो माझं असं रडणं पाहून तिला मात्र ह्याला काहीतरी झालंय म्हणून तिने विचारलं काय झालं रे असा का रडतोस सांग सगळं मला आताच. मग मी माझ्या बाबतीत घडलेला हा सगळा प्रकार सांघितला सगळे गावकरी आणि आजी घाबरली आणि म्हणाली पोरा वाचल्यास रे पुन्हा असं न सांगता जाऊ नकोस. मुंबईहून गावी ह्याच साठी आलास का आता जोप गप्प मी त्या रात्री जोपा गेलो. 

सकाळी पक्क्याच्या घरी गेलो मग पक्क्याने मला सांघितलं कि ती जी कोणी होती काळ रात्री, ती स्त्री कार अपघाताने ५ वर्षा पूर्वी मेलीये. ती अधून मधून गावात दिसते असं गावकरी म्हणतात. काळ तुज नशीब बलहत्तर म्हणून वाचलास मी नसतो आलो तर तिने रस्ता चुकवून तुला मारलच असत. 

तीच ते किंचाळणं अजूनही मला आठवलं कि अंगावर काटा उभा राहतो.    

Comments

  1. रात्री एक वाजता कोणत्या येस्टी बसेस चालतात कोकणातील गावात??

    ReplyDelete
    Replies
    1. भावा ती २० मिनटे बोलतच होती का तिने बसस्टँड वर का आणल

      Delete
    2. Thanks for the comments both of you.

      Delete
  2. रात्रीच्या वेळी कोण मूर्ख घरातल्यांना काही न सांगता 40 मिनिटांसाठी बाहेर जातो? जायला 20 मिनटं , यायला 20 मिनटं. आणि पक्याला बघून ती निघून का गेली . चांगली एका वेळी 2 सावज सापडली होती की.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एक होती चेटकीण...

भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा

एक सत्य घटना : Marathi Bhay Katha