“अतृप्त आत्मा “ गावाकडच्या भुताच्या गोष्टी
“अतृप्त आत्मा “ गावाकडच्या भुताच्या गोष्टी Marathi Suspense Stories रुपाली…!! खूप आवडायची मला. ते वयच तसं होत अन ती होतीच इतकी सुंदर कि मला काय, आख्ख्या वर्गाला ती आवडायची. आवडण्यासारखीच होती ती काळेभोर डोळे, जणू प्रेमाचा अथांग डोह. एक वेगळच तेज असायचं त्या डोळ्यांत. लांब सडक केस..!! तीनं त्यांना जणू वाऱ्यावर सोडून दिलं असावं, तरीही ते बिचारे, तिच्याशी ईमान राखून असायचे.सरळसोट, सिल्की आणि शाईन,चेहर्यावर पुढं पुढं करणार्या बटा…!! आपल्या नाजूक हातांनी त्या सावरण्यात, तीचे दिवसातले चोवीस ताससुद्धा खर्ची पडत. लांब नाक…! गोरा रंग…! आणि प्रसन्न चेहरा…!! सदैव ओळखीचं हसू दाखवणारा, नाईन्टीजमधली नीलम आठवतेय का हो तुम्हाला बस..!! अगदी तशीच दिसायची. तिच्या या मोहक अदांनी साहजिकच त्यावेळी चिपळूणमध्ये हार्ट पेशंटची संख्या वाढलेली होती, तरीही.. तिची अन माझी ओळख, निदान तोंडओळख तरी रहायला हवी. अर्थात याउप्पर मला दुसरं काही परवडण्यासारखंही नव्हतं म्हणा. खरं तर आम्ही त्यांचे भाडेकरू. नव्या भैरीच्या पल्याड, त्यांचा एक मोठ्ठा बंगला होता. ant मागच्या बाजूला आऊटहाऊसमधे दोन खोल्या, तिथेच रहायचो आम्...