एक होती चेटकीण...
एक होती चेटकीण- Marathi Ghost Stories यात तिचा काही दोष नव्हता, असंच कुणालाही वाटलं असतं. पण तिचे हात रक्ताने माखलेले होते. तिच्या ओठांवर पसरलेलं रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या ड्रॅक्यूला प्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा. तिचा तो अवतार भयाण असाच होता. पोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं. तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचा थरकाप उडाला असता. ही दहा वर्षांची चिमुरडी एखाद्या चेटकीणी सारखी भासत होती. तिची नजर अगदी स्तब्ध होती. महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण ती हू नाही की चू नाही. केवळ शून्यात पाहत होती. काय घडलं असेल आदल्या रात्री? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. तिचं नाव शाल्मली. अनूज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या. सविताने शाल्मलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेली नाही. कसंबसं तिने दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला. शाल्मली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे. पण ती शारीरिक आणि मानसिक रितीने सुदृढ आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं ...