Posts

Showing posts from September, 2019

कोकणातील दवाखाना :- Kokan Marathi Ghost Story

Image
कोकणातील दवाखाना :- Kokan Marathi Ghost Story कोकण म्हटलं की आपल्याला आठवते ते निळाशार समुद्र, आंबा-फणस-नारळ-पोफळीच्या बागा, दरी-खोऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे . त्याचसोबत कोकणात अनेक ठिकाणी आपल्याला काहींना काही गूढ, ऐतिहासिक, काही देवांच्या, काही भुतांच्या अशा गोष्टी ऐकायला मिळतात.  नमस्कार मित्रानो!! मी एस. एर. , मी मूळचा कोकणातलाच आहे, लहानपानापासूनच रहस्यमयी कथा ऐकायला मला फार आवडतात. त्यामुळे गावी गेलो की माझ आवडीचं काम म्हणजे एखाद्या अनुभवी व जुण्या-जाणकार लोकांची भेट घेऊन त्यांच्याकडून गावच्या इतिहासाबद्दल, काही जुन्य्या घटनांबद्दल,असाधारण घटनांबद्दल जाणून घेणे. सदर कथा ही मी माझ्या आजीकडून ऐकली आहे. ती लहान असताना ही घटना तिच्या गावच्या शाळेत घडली होती. तर कथेला सुरुवात करतो. भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त ५-६ वर्ष झाले होते. देश स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अगदी जोमाने प्रयत्न करत होता. त्यातच गांधीजींच्या बोलण्यानुसार “जर देशाची प्रगती करायची असेल तर ग्रामीण भागाचा प्रथम विकास करा”, गावोगावी अनेक नवीन योजना राबवण्यात येऊ लागल्या. त्याच योजने...

एक डाव भुताचा : Kokan Marathi Ghost Story

Image
एक डाव भुताचा : Kokan Marathi Ghost Story " किती येळ लावतेस झालच नाही का तूय सामान बांधून, तिथं काय जनमभर नाही राहायचं&nbspआपल्याले" सुभाष सामानाची गाठोडी बैलगाडीत टाकत कावेरीला बोलत होता. " गडबड काहून करून राहिले बरं तुम्ही, काही चिजवस्तू ईसरली म्हणजे त्या रानात काय करायचं" कावेरी तिच्या नवऱ्याला सुभाषला हातातलं काम थांबवून कमरेवर हात ठेवून बोलत होती. कावेरी आणि सुभाषचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. परिस्थिती बेताचीच होती. शेतमजुरी करून दोघे संसाराचा गाडा हाकत होते. गावात काम मिळायचं पण कामाच्या बदल्यात त्याला मोबदला पुरेसा मिळत नव्हता. बाराही महिने पैशांची चणचण भासत होती. कावेरी तशी काटकसरी होती. वायफळ खर्च करायला तिला आवडत नसे. चटणी भाकर खाऊन ती भविष्याचे स्वप्न रंगवत होती. सुभाष पण कष्ट करायला कुठे कमी पडत नव्हता. त्याला मुंबईला कामाला जायचं होतं. मुंबईला वर्षभर काम करून बऱ्यापैकी पैसा मिळवता येईल असं त्याच्या डोक्यात होतं. त्याने त्याचा मनसुबा कावेरीला बोलुन सुद्धा दाखवला. पण कावेरीला काय ते आवडले नाही. तिने स्पष्ट नकार दिला. तिला दिवस गेल...

ही प्रचलित भूतं कधी तुमच्या वाट्याला आली आहेत का?

Image
ही प्रचलित भूतं कधी तुमच्या वाट्याला आली आहेत का? कितीही भीती वाटली तरी हॉरर चित्रपट पाहायला अनेकांना आवडतात. आता भूत आहेत किंवा नाही या वादात आम्हाला पडायचे नाही. पण अनेकांकडून भूताच्या काही गोष्टी ऐकल्यानंतर काही भूतांची नावे तुमच्याही कानावरही पडली असतील किंवा तुम्ही देखील भूतांच्या काही गोष्टी ऐकल्या असतील. अशाच काही प्रचलित भूतांची यादी आम्ही केली आहे. तुम्हालाही ही भूतं किंवा त्यांच्या गोष्टी माहीत आहेत का ? मानकाप्या : मानकाप्या भूताबद्दल ही तुम्ही नक्कीच कोणाकडून ऐकले असेल. या भूताला नुसते धड असते. वर मुंडके नसते. म्हणूनच त्याला मानकाप्या भूत म्हणतात.  हा भूत म्हणे कधी घोड्यावर तर कधी तर कधी चालत फिरत असते. मुंबईतील अनेक ठिकाणी आजही मानकाप्या भूताचा वावर आहे, असे म्हटले जाते. हा भूत नेमकं काय करतो या बाबत एकमत असे नाही. पण या भूताच्या मार्गावर आले तर तो तुम्हाला मारतो असे म्हणतात. देवचार: कोकणातील असाल तर तुम्हाला हमखास देवचार हे नाव माहीत असेल. आता देवचार म्हणजे काय ? हे तुम्हाला माहीत नसेल तर वाचा....