कोकणातील दवाखाना :- Kokan Marathi Ghost Story
कोकणातील दवाखाना :- Kokan Marathi Ghost Story
कोकण म्हटलं की आपल्याला आठवते ते निळाशार समुद्र, आंबा-फणस-नारळ-पोफळीच्या बागा, दरी-खोऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे . त्याचसोबत कोकणात अनेक ठिकाणी आपल्याला काहींना काही गूढ, ऐतिहासिक, काही देवांच्या, काही भुतांच्या अशा गोष्टी ऐकायला मिळतात.
नमस्कार मित्रानो!! मी एस. एर. , मी मूळचा कोकणातलाच आहे, लहानपानापासूनच रहस्यमयी कथा ऐकायला मला फार आवडतात. त्यामुळे गावी गेलो की माझ आवडीचं काम म्हणजे एखाद्या अनुभवी व जुण्या-जाणकार लोकांची भेट घेऊन त्यांच्याकडून गावच्या इतिहासाबद्दल, काही जुन्य्या घटनांबद्दल,असाधारण घटनांबद्दल जाणून घेणे.
सदर कथा ही मी माझ्या आजीकडून ऐकली आहे. ती लहान असताना ही घटना तिच्या गावच्या शाळेत घडली होती. तर कथेला सुरुवात करतो.
भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त ५-६ वर्ष झाले होते. देश स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अगदी जोमाने प्रयत्न करत होता. त्यातच गांधीजींच्या बोलण्यानुसार “जर देशाची प्रगती करायची असेल तर ग्रामीण भागाचा प्रथम विकास करा”, गावोगावी अनेक नवीन योजना राबवण्यात येऊ लागल्या. त्याच योजनेअंतर्गत त्यावेळी गावामध्ये प्रथमच एक प्राथमिक रुग्णालय चालू करण्यात आले. या इस्पितळाचा मुख्य हेतू हा गावातील गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान योग्य उपचार देणे हा होता, कारण गावाची पूर्वीची स्तिथी फार बिकट होती ,सर्व रोगांचे निदान हे काही घरगुती उपायांनीच होत असे, अगदी प्रसूती साठी देखील जुनीच पद्धत वापरत असत त्यामुळे अनेकदा हे आई आणि बाळ अशा दोघांनापण धोखादायी ठरत असे.
गावात रुग्णलाय चालू झाल्यावर देखील सुरुवातीला लोक तिथे जाण्यास तयार नव्हते, त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असे तेव्हा लोक रुग्णालयात धाव घेत असत, असेच प्रसूती दरम्यान काही कॉम्प्लिकेशन आल्या कि लोकांना डॉक्टर ची आठवण येत असे. लोकांच्या अशा हलगर्जीपणामुळे डॉक्टर सुद्धा कधी कधी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काही करू शकत नव्हते. सुरवातीला तर उशिरा उपचारामुळे इस्पितळात आणि आवारात अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता.
असे म्हणतात कि अशा प्रकारे जर गर्भवती स्त्रीचा मृत्यू झालातर, त्या स्त्रीचा आत्मा सहजासहजी मुक्त होत नाही आणि अशा अतृप्त आत्म्याला ‘हडळ’ असे संबोधले जाते. हे भुतांच्या प्रकारातील सर्वात वाईट भूत मानले जाते.
असेच काही महिने उलटून गेले आणि मग रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना रात्रीच्या वेळी विविध अनुभव येऊ लागले. कधी रडण्याचा आवाज तर कधी तरी गुरगुरण्याचा. कधी कधी तर रुग्णालयात ऍडमिट असलेल्या गर्भवती स्त्रियांना व नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रियांना अनेक भास होत असे जसे काही कोणी तरी त्यांना त्यांच्या कडे रागाने बघत आहे, कोणीतरी त्यांच्या बाळाला नेण्याचा प्रयत्न करतात आहे. डॉक्टर सुद्धा तिकडे रात्रीच्या वेळीस जाण्यास घाबरत असत. लोकांनी देखील तिकडे जाणे सोडून दिले होते, त्यामुळे अगदी वर्षभरातच ते रुग्णालय बंद करण्यात आले.
असेच ५-६ वर्ष निघून गेली गावातील कोणीही तिकडे जात नसे, अगदी सकाळच्यावेळी सुद्धा जर एखाद्याची गुरे चुकून चरत तिकडे गेली तर तो गुराखी देखील तिकडे जाण्यास धजावत नसे. हे रुग्णालय तसे गावापासून ५मिनिटावर एका सड्यावर(थोडासा उंच भाग) बांधले होते. आजू बाजूला रान वाढले होते, दात झाडी झाली होती, रुग्णालयाची वास्तू अगदी भकास झाली होती.
काही वर्षांनी गावी एका नवीन,तरुण व निर्भीड अशा कलेक्टर ची नियुक्ती झाली होती. एकदा गावच्या समस्यांबद्दल बोलताना त्याला गावी शाळा आणि इतर सुविधांचा अभाव असल्याचे कळले. तेव्हा त्याने गावी नवीन शाळा बांधण्यासाठी जागा शोधण्याचे काम चालू केले, तेव्हा त्याला त्या सरकारी जागा अणि त्यावरील त्या जुन्या रुग्णालयबद्दल समजले. त्याने माहिती मिळवली असता जुन्या झालेल्या सर्व प्रकारांबद्दल त्याला कळले. यातून गावी शिक्षणाचा सुद्धा किती अभाव आहे हे त्याला पटले. त्याने लगेच त्या जुन्या रुग्णालयाच्या जागी एक सुंदर शाळा उभारायचे ठरवले.
शाळेचे बांधकाम चालू असताना अनेक अडथळे आले पण त्या कलेक्टर ने जिद्दीने १-२ वर्षात त्या शापित जागेवर एक सुंदर ज्ञानाचे मंदिर उभारले. लोक सुरवातीला आपल्या मुलांना तिकडे पाठवायला तयार नव्हते पण नंतर कलेक्टरच्या अथक प्रयत्नानंतर आणि शिक्षणाचे महत्व पटवून दिल्यानंतर लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार झाले, पण गावातील लोकांनी एक अट ठेवली संध्याकाळी ६ पर्यंतच शाळा चालू ठेवायची. कलेक्टर ने ती अट मान्य केली आणि मग गावात नवींन शाळा चालू झाली. त्या शापित जागेवर आता ज्ञानाचे पाठ गिरवण्यात येऊ लागले. पण ते सारे अजून थांबले नव्हते संध्याकाळी शाळा बंद केल्या नंतर विशेषतः अमवासेच्या रात्री अनेक घटना शाळेत घडत असत जसे कि बेंच अस्थव्यत होणे, फलकावर काहीही गिरपटले असत. पण कलेक्टर ने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्या चांगल्या कामात विघ्न येऊ नयेत म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. तसेच शाळा ही सकाळ ते दुपार याच वेळेत चालू असे त्यामुळे मुलाना देखील काही त्रास होत नव्हता, तसेच गावातल्या लोकानी ठेवलेल्या अटीनुसार संध्याकाळी कोणीही तिकडे थंबत नसे. असाच काही काळ उलटुन गेला कलेक्टर साहेबानी गावत अनेक विकासाची कामे केली, त्यांची सुद्धा आता दुसऱ्या गावी बदली झाली होती. शाळा वैगेरे सर्व त्यांच्या नियोजित वेळेनुसार व्यवस्थित चालु होते.
अशात काही महिन्यानी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे काही नविन शिक्षकांची शाळेत भर्ती करण्यात आली. त्याच भर्ती मधे खान्देशातुन आलेल्या व नुकत्याच शिक्षकी पेशात आलेल्या सुरेश, भिकाजी, निलेश आणि सुनिल (नावे बदललेली) अशा चौघांची निवड करण्यात आली. त्या चौघांसाठी हा भाग, तिथली भाषा, जेवण सारे काही नविन होते. गावातच एका किराणामालाच्या दुकानाच्या मागचा रिकामा भाग त्यांना घर म्हणून भाड्याने मिळाला होता. गावात शिक्षक म्हणून तसा त्यांना मान होताच, ते चौघेदेखील गावात अगदी सर्वांसोबत गुण्यागोविंदाने राहत असत, कधी कोणाला काही मदत लागली तर नेहमी पुढे असत. गावातल्यांकडून त्यांना शाळेत संध्याकाळ नंतर न थांबण्याचे बजावण्यात आले होते, तसेही दिवस भर शाळेत शिकवून दमत असल्याने ते देखील कधी शाळेत थांबत नसत. असेच काही महिने निघून गेले आणि वेळ आली ती वार्षिक परीक्षेची सर्व मुले फार खुश होती कारण आता २ महिने त्यांना सुट्टी मिळणार होती. परीक्षेचा शेवटचा पेपर झाला सारी मुले अगदी बागडत शाळेतून बाहेर पडली, परंतु आता खरी परीक्षा हि शिक्षकांची चालू झाली होती कारण त्यांना दिलेल्या निकालाच्या तारखेआधी प्रगती पुस्तक तयार करायची होती.
सुरेशने तर अगोदरच चौघांच्या गावी जायच्या तिकिटी काढून ठेवल्या होत्या, त्यामुळे पटापट प्रगती पुस्तकांचं काम आटपायच असं चौघांनी ठरवले. एक दिवस चौघेही शाळेत पेपर तपासात बसले होते, हळूहळू दुपार होऊ लागली बहुतेक शिक्षक आजचे तपासणीचे काम आटपून घरी निघून गेले होते, आता फक्त शाळेत ते चौघेच होते. येत्या २ दिवसात सर्व काम फत्ते करायचं असं त्यांनी ठरवलं होत. चौघेही अगदी मन लावून आपापले काम करत होते, घड्याळाकडे त्यांचे लक्षच नव्हते. संध्याकाळचे ५ वाजून गेले तसा शाळेचा शिपाई रामू तिकडे आला त्यांनी चौघांनाही वेळेचं भान आणून दिले व आता शाळा बंद करायची असल्याचे सांगितले. ६वाजल्यानंतर इकडे कोण थांबत नाही याची देखील आठवण करून दिली पण त्यांना काही करून काम संपवायचे होते आणि तसाही त्या चौघांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी रामूला जवळ बोलावले आणि त्याच्या खिशात काही पैसे कोंबून त्याला सुद्धा सोबतीला थांबन्यास सांगितले. अजून फक्त २ तास मग आपण सर्वच एकत्र जाऊया, तसेच पैसे मिळाल्यावर रात्रीची दारूची सोय झाली होती म्हणून रामू देखील त्यांच्यासोबत थांबला.
सर्वजण आपापल्या कामात व्यस्थ होते,रामू सुद्धा खुर्चीवरबसून पेंगत होता. संध्याकाळचे ७ वाजून गेले होते आणि त्यात त्या ५ जणांचे नशीब वाईट म्हणून आज अमावास्येची रात्र होती.तसेच गावात तेव्हा विजेचा सुद्धा काही भरवसा नव्हता आणि चक्क त्यादिवशीसुद्धा शाळेत वीज नव्हती. ते कंदिलाच्या प्रकाशात काम करत होते. पेपर तपासात असताना सुनीलची नजर दरवाज्यापाशी गेली कोणीतरी एक बाई आपल्या छोट्या बाळाला कडेवर घेऊन काहीतरी खाण्यासाठी मागत असल्याचे त्याला त्या बाहेरच्या काळोखात जाणवले. सुनीलने बाकिच्याना देखील ते निदर्शनास आणून दिले, सुरेश बोलला ,”अरे असेल कोण तरी गावातली गरीब बाई, उपाशी असेल म्हणून खायला मागत असेल”,असे म्हणून त्यांनी आपल्या दुपारच्या जेवणातील उरलेली चपाती आणि भाजी रामूकडे दिली आणि तिला देऊन यायला सांगितले, रामू डोळे चोळतच उठला आणि तो बाजूला ठेवलेला कंदील घेऊन दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागला, कंदीलच्या प्रकाशात त्याने दरवाजात बघतले तर तिकडे कोणच नव्हते, त्यानेबाहेर देखील पाहिले कोणीही नव्हते. तो पुन्हा जागेवर येऊन बसला. “अरे गेली असेल ती फुढे, जाऊन देत चल”असे म्हणून सुरेश ने परत सर्वाना कामाला लागायला सांगितले. ५- १० मिनीटांनी पुन्हा ती बाई दरवाज्यावर उभी राहून काही खाण्यासाठी मागू लागली पण पुन्हा तेच रामू कंदील घेऊन दरवाज्यापाशी गेल्यावर तिकडे कोणीच नाही. असा प्रकार अगदी ३-४ वेळा घडला. शेवटी ५ व्यांदा सुनीलने रागातच विचारले ” कोण आहे तिकडे, जेवण हवे आहे तर मग घ्या ना”,असे म्हणून तो स्वतःच दरवाजापाशी गेला तेव्हा जणूकाही हवेत विरघळावी तशी ती स्त्री आपल्या बाळासोबत कुठे तरी विलीन झाली. सुनील जरा घाबरलाच होता. त्याने बाकिच्याना देखील हि गोष्ट सांगितली. पण सुरेश आणि बाकी दोघांचा त्यावर विश्वास नव्हता ,बाई अशी कशी हवेत गायब होईल. रामूला मात्र हे सगळे काय चालू आहे ते कळले होते, त्याने सर्वाना इकडून लवकर निघूया असे सांगितले पण सुनील सोडून कोणीही त्याच ऐकलं नाही.”अरे थोडाच काम बाकी आहे काही नाही होणार, तुम्हाला भास झाला असेल”, सुरेश बोलला. काही काळ असाच गेला ती बाई सुद्धा बराच वेळ दिसली नव्हती. ” बघ बोललेलो ना गावातलीच असणार ती बाई कोणतरी उगाच घाबरता तुम्ही राव”,सुरेश बोलला. त्याच बोलणं थांबत तोच तो ज्या खिडकी जवळ बसला होता तिकडून बाहेरच्या बाजूने कोणी तरी बाई हुंदके देत रडण्याचा आवाज त्यांना येऊ लागला. आता मात्र सुरेश सुद्धा जरा घाबरला होता, त्याने हळूच खिडकी बाहेर डोकावून बघितले, त्याने जे बाहेर पहिले ते पाहून त्याचे जणू डोळेच फिरले, तो जागच्याजागीच बेशुद्ध झाला. बाकीच्यांनी त्याला सावरले आता सर्वांनाच तो आवाज आला होता त्यांनी बाहेर बघितले तर त्यांची जणू दातखिळीच बसली, तोंडातून काही शब्दच निघत नव्हता. एक स्त्री बाहेरच्या झाडापाशी बसली होती आणि तिच्या हातात एक बाळ होते पण त्या बाळाला फक्त धड होते, त्याला मुंडकेच नव्हते.
मान खाली घालून ती नुसती रडत होती, हळूहळू आवाजाची तीव्रता वाढत होती, आणखी काही जणींचे रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज त्याना येऊ लागले. बाहेर जे काही चालू होते ते बघून ते जागीच स्तब्ध झाले होते. अचानक त्यांना बाजूने गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला त्यांनी पहिले तर मगाशी बेशुद्ध झालेला सुरेश त्यांच्याकडे रागाने बघत होता, त्याचे डोळे पूर्ण सफेद झाले होते व तो वेगळ्या आवाजात “नाही सोडणार!!”, असे सारखे बोलत होता. बिथरलेल्या अवस्थेतच त्या चौघांनी कोपऱ्यात लावलेल्या देवाच्या फोटो कडे धाव घेतली तोच त्यांच्या मागे येणारा सुरेश पण खाली कोसळला. जणू काही आताच त्याच्या शरीरातून काही तरी बाहेर पडले असावे असे वाटले. त्यानी क्षणाचाही विलंब न करता सुरेशला सावरत तिकडून पळ काढला, पाठी मागून अनेक रडण्याचे आणि किंकाळ्याचे आवाज येत होते पण त्याने अजिबात पाठी न बघता थेट किराणामालाचे दुकान गाठले. दुकानात पोहचल्यावर ५ हि जण तिकडेच खाली पडले. दुकानांत असलेल्या काही गाववाल्यानी त्यांना सावरले आणि पाणी दिले, कोणीही काहीही बोलायच्या मनःस्तिथीत नव्हते, ५ हि जणांना कडकडून ताप आला होता, लगेच गावातील वैद्याला बोलावण्यात आले. दुसऱ्यादिवशी सकाळी जरा बरे वाटल्यावर त्यांनी गावातल्याना झाल्या प्रकाराबद्दल सांगितले. सर्वजण त्यांच्या खूप रागावले होते कारण इतकं बजावून सुद्धा संध्याकाळी ६ नंतर ते शाळेत थांबले होते. नंतर त्यांनी एक समजूत म्हणून गावातील पुजाऱ्याला बोलावले आणि त्या सर्वांवरून नारळ ओवाळून तो नारळ गावच्या वेशी बाहेर टाकून दिला. काही दिवसानी बरे वाटल्यावर आपले काम आटपून चौघेही आपल्या गावी निघून गेले ते परत आलेच नाहीत.
त्यानंतर काही वर्षांनी गाववाल्यांच्या सततच्या पाठपुरवठ्या नंतर ग्रामपंचायतीने ती जुनी शाळा कायमची बंद करून गावातच दुसऱ्या जागी शाळा चालू करण्याचे ठरवले. पुन्हा काही वर्षांनी तिकडे पोस्ट ऑफिस, त्यानंतर टेलिफोन ऑफिस चालू झाले होते पण ते सुद्धा तिकडे फार काळ टिकले नाही वर्ष बहराच्या आत ते सुद्धा बंद झाले आणि आता ती जागा अजूनही अशीच पडून आहे कोणीही सहसा तिकडे जात सुद्धा नाही.
समाप्त !!
Credit goes to Ankit Pise
hii mitra mala ti jaga konti aahe sangshil ka plz
ReplyDeleteVikat gheyachi aahe ka mitra tula 😅
DeleteJagech nav nahi sanghu shakat but thanks for the comment.
DeleteBr gavach nav tri sang na plz
DeleteNice story
ReplyDeleteThanks for the comment
DeleteHi narendra, tuzya kade ashach bhaykatha asatil tar mala pathav, mail id: contact.mkstoryteller@gmail.com
ReplyDelete