भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा

 भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा 

kokan marathi ghost story


साधारण दोन वर्षापूर्वी मे महिन्यात मी आणि माझ्या मामाचा मुलगा सिनेमा पाहून रात्री साधारण बारा वाजता घरी येत होतो.. पोर्णिमा होती त्यारात्री....

आमच्या मामाच्या area मध्ये आल्यावर अचानक गार वार सुटला . एवढ्या वाऱ्यात गाडी चालवण जरा धोक्याचाच..म्हणून आम्ही थांबायचा विचार केला .

आमच्या मामाच्या area मध्ये जुना वाडा आहे. तो ३० वर्षापासून बंद आहे . आम्ही तिथे बाईक लाऊन बसलो ..

त्या वाड्यातून आम्हाला एक बाई येताना दिसली.. तिने पांढरी साडी घातलेली.. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यातून रक्त येत होत. तिच्या डोक्यावर केस नव्हते. ती संपूर्ण टकली होती.. तिचा हा अवतार पाहून आमची जरा टरकलीच ...

ती आमच्याकडे पाहून विचित्र हसली..आम्ही खुप घाबरलो.

आम्ही बाईक स्टार्ट केली, आणि तिथून पळ काढला. ती आमच्या मागे पाळायला लागली .

आम्ही आमची Pulsar full speed वर पळवली . तरीही त्या बाईचा वेग जवळ जवळ आमच्या इतकाच होता.. आम्ही खूप घाबरलो..

त्या स्त्रीने आमच्या घराच्या फाटकापर्यंत आमचा पाठलाग केला.. आणि फाटकावर येउन ती थांबली..

आम्हाला रात्रभर झोप नाही आली.. मी ही गोष्ट माझ्या आईला सांगितली ..ती ही म्हणाली की मी ही तिला पाहिलं होत .

नंतर आम्ही सकाळी त्या बाईबद्दल आजीला विचारले..

ती म्हणाली कि, "मीसुद्धा त्या बाईला पहिल आहे.. ती बाई ३० वर्षापूर्वी त्या जुन्या वाड्यात नवऱ्यासोबत राहायची.. एकदा तिच्या जेवणात केस निघाला, म्हणून तिच्या नवर्याने तिला मारझोड करून तिचे केस कापले, आणि चाकूने वार करून तिची हत्या केली.. त्यानंतर जो तिचा नवरा पळून गेला तो कधी आलाच नाही.. तेव्हापासून ती दर पौर्णिमेला दिसते.."

नंतर आम्ही कधीच रात्री बाहेर थांबलो नाही..

तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल किंवा नसेल आवडला तरी तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट द्व्यारे कळवा 🙏

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एक होती चेटकीण...

एक सत्य घटना : Marathi Bhay Katha