Posts

Showing posts from May, 2019

गोष्ठ एका पिऱ्याची...

Image
Marathi Horror Katha / Marathi Bhay Katha गोष्ठ एका पिऱ्याची...  मी आज तुमच्यासाठी माझ्या वडीलांनी सांगितलेला एक खरा खुरा किस्सा सादर करत आहे भूतं प्रेत आत्मा वाईट शक्ती ह्या सर्व गोष्टी असतात किंव्वा नसतात हा मोठा वादाचा मुद्दा आहे. काही विश्वास ठेवणारे सापडतात तर काही मनाचे भास अंधश्रद्धा वैगेरे म्हणतात. पण म्हणतात ना किस्मत खराब हो तो उंट पर भी कुत्ता काटलेता हे तसेच आपले ग्रह वाईट असेल आणि वाईट वेळी वाईट ठिकाणी वाईट शक्तींच्या कचाट्यात चांगल्या प्रकारे फसतो मग आपल्या बुद्धीला न पटणाऱ्या आकलना पलिकडच्या अविश्वसनीय प्रसंग घडतात असच काहीस घडलं शांताराम पडोळे व मनोहर मने ह्या तिशीतल्या तरुणानं सोबत दोगेही रेल्वेत काम करणारे परस्परांचे सहकर्मी हुषार चांगले मित्र साधारण ऐंशी च्या दशकातील गोष्ट दोघी मित्रांच्ची बदली रोह्याला झाली मित्राची साथ आणि कुठे तरी नवीन ठिकाणी रहायला भेटणार म्हणून दोघेही मनोमन आनंदीच होते आणि थोडी बढतीही भेटली होती त्याचा आनंदच वेगळा होता पण घड्याळाच्या काट्या प्रमाणे कशे जुळून येणार आणि घड्याळाचा सारखेच कशे बारा वाजणार ह्याची तिळमात्र कल्पना दोघांन...

शिवानीचा बदला - Marathi Real Ghost Story

Image
शिवानीचा बदला  शिवानीला स्वतःच्याच शरीराची घृणा वाटत होती. तिला आता जगायचंच नव्हतं. पूर्ण शरीरातून वेदनांचा महापूर आला होता. ती मेल्या सारखी निपचीत पडली होती. चार चार लांडग्यानी तीचं सुंदर शरीर चोळामोळा केलं होतं. असा एकही अवयव नव्हता की जो ठणकत नव्हता. खरंतर आज ती स्पर्धेत भागच घेणार नव्हती. पण तीच नाटकाची हिरॉईन असल्यामूळे तिला यावच लागलं होतं. गेला आठवडाभर हे चौघं तिला एवढे छळत होते की तीच्या सारखी एकांकिकेत सलग तीन वर्षे उत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळवणारी मुलगी स्वतःचे संवादच विसरत होती. त्यांच नाटक शेवटून दुसऱ होतं. ती जिद्दीला पेटली. एखादा रिकामा उघडा असा वर्ग शोधून तिथे नीट नाटकाचे संवाद पाठ करू असा विचार करत ती वरच्या मजल्यावर निघाली. कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावर एक उघडा वर्ग तीला सापडला. जो आॅडीटोरीयमच्या विरूद्ध दिशेला होता. त्यात आतून कडी लाऊन नाटकाची संहिता नीट डोळ्याखालून घालू लागली. साधारण संध्याकाळी 7.30....8..... नंतर त्यांच नाटक असेल असा तीने हिशोब केला. मन एकाग्र करायचा तीने खुप प्रयत्न केला. पण तिला आठवड्याभरातलेच प्रसंग आठवू लागले. ते चौघं आत घुसले. त...

असे काय घडले त्या रात्री रोहिणी सोबत...

Image
* ती काळरात्र * Real Ghost Stories in Marathi ओह ! शीट !! गाडीला पण बंद पडायला आताच मुहूर्त मिळाला. रोहिणी चिडून स्वतःशीच बोलली.  रोहिणी एका प्रसिद्ध मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करीत होती. एकदम मॉडर्न विचारांची, बिनधास्त २८ -२९ ची तरुणी. स्वतःचा ४ रूम चा प्रशस्त ब्लॉक. आई वडील, लहान भाऊ आणि लहान बहीण गावी राहत होते. गावावरून आईने पाठवली राधा मावशी बरोबर ती राहत होती. मॉडर्न असल्यामुळे दारू, स्मोकिंग पार्ट्या तिला निषिद्ध नव्हते. किंबहुना आवड होती. पब मध्ये जाणे येणे होते. अशी हि रोहिणी काही अर्जंट कामासाठी मुंबई वरून गावी चाललेली आता चांगलीच वैतागलेली होती. शुक्रवारी रात्री निघून, रविवारी रात्री परत येण्याचा तिचा विचार होता. आता पर्यंत ती अशी बऱ्याच वेळा जाऊन आलेली. तशीच ती आज पण निघाली. पण आज सुरवाती पासूनच तिला नाट लागली. अगं ! आज रात्रीची नको निघूस. आज अमावस्या चालू झाली आहे. उद्या सकाळी निघ. राधामावशी पहिली आडवी आली. काही नाही होत अमावास्येला निघून. सगळे थोतांड आहे. माझा नाही विश्वास, असे म्हणून रोहिणी निघाली. घाई गडबडीत मोबाईल घरी विसरली. परत लिफ्टने वर य...