शिवानीचा बदला - Marathi Real Ghost Story
शिवानीचा बदला
शिवानीला स्वतःच्याच शरीराची घृणा वाटत होती. तिला आता जगायचंच नव्हतं. पूर्ण शरीरातून वेदनांचा महापूर आला होता. ती मेल्या सारखी निपचीत पडली होती. चार चार लांडग्यानी तीचं सुंदर शरीर चोळामोळा केलं होतं. असा एकही अवयव नव्हता की जो ठणकत नव्हता. खरंतर आज ती स्पर्धेत भागच घेणार नव्हती. पण तीच नाटकाची हिरॉईन असल्यामूळे तिला यावच लागलं होतं. गेला आठवडाभर हे चौघं तिला एवढे छळत होते की तीच्या सारखी एकांकिकेत सलग तीन वर्षे उत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळवणारी मुलगी स्वतःचे संवादच विसरत होती. त्यांच नाटक शेवटून दुसऱ होतं. ती जिद्दीला पेटली. एखादा रिकामा उघडा असा वर्ग शोधून तिथे नीट नाटकाचे संवाद पाठ करू असा विचार करत ती वरच्या मजल्यावर निघाली. कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावर एक उघडा वर्ग तीला सापडला. जो आॅडीटोरीयमच्या विरूद्ध दिशेला होता. त्यात आतून कडी लाऊन नाटकाची संहिता नीट डोळ्याखालून घालू लागली. साधारण संध्याकाळी 7.30....8..... नंतर त्यांच नाटक असेल असा तीने हिशोब केला. मन एकाग्र करायचा तीने खुप प्रयत्न केला. पण तिला आठवड्याभरातलेच प्रसंग आठवू लागले.
ते चौघं आत घुसले. त्यांनी दार लावलं ( स्पर्धा खालच्या अॉडीटोरीयम मधे होत्या. आणि आता सुट्टया असल्याने कुणी वर तिच्या मदतीला यायची शक्यता नव्हती.) त्यांना बदला घ्यायचा होता. त्यांच्यावर पोलिस केस करण्याची हिंमत करणारीची ते अशा विकृत पद्धतीने बदला घेतील याची कल्पना पण तीने केली नसेल. आधी त्यांनी तीला विवस्त्र करून तिचे हात वरती एका बेंच ला बांधले. दोन्ही पाय वेगवेगळ्या डेस्क ना बांधले. तोंड बांधलं. एकावेळी तिघं तिला झोंबत होते आणि एक त्याचं मोबाईल ने शुटींग घेत होता. त्या एक दिड तासात तिच्यावर किती बलात्कार आणि किती जखमा झाल्या हे कुणाला मोजताही आले नसते. त्या नराधमांचं समाधान झाल्यावर ते निघून गेले. नीचपणाचा कळस म्हणजे जाताना तिचे बांधलेले हात पाय सोडून तिचे फेडलेले कपडे बरोबर घेऊन गेले. वेदनेनी तळमळून ती ग्लानीत गेली. रात्री 9....9.30 ला तिला शुद्ध आली. तिची जगण्याची इच्छाच नाहिशी झाली होती. तिला आता फक्त एकच इच्छा होती. पाचव्या मजल्यावर, गच्चीत जाऊन तिथून हे अत्याचारीत गलिच्छ शरीर खाली झोकून द्यायचे. तिला उठता येत नव्हतं. ती सरपटत सरपटत व्हरांड्यात आली. तिला तीन मजले चढून वर जायचे होते. तिथे तिला तिची अोढणी मिळाली . तिने ती जेमतेम शरीराला गुंडाळली . पूर्ण शरीर रक्तानी माखलं होत. तिला 6 जिने चढून गच्चीत जायला 1.....1.30 तास लागला. ती केवळ इच्छाशक्तिच्या बळावर गच्चीत पोहोचली. तिच्या भळभळणा-या जखमांमुळे सुरवाती पासून गच्चीच्या कठड्या पर्यंत उठलेल्या रक्ताच्या सड्यामूळे ती कशी सरपटत गेली असेल ते दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळणार होते.
पहाटे छिन्नविछिन्न अवस्थेत तीचं प्रेत कॉलेजच्या आवारात सापडलं. नेहेमी प्रमाणे खळबळ माजली. TV वर चर्चा रंगल्या. देशभर मेणबत्ती मोर्चे निघाले. त्या चौघाना पोलीसांनी पकडले. कोर्टात केस उभी राहिली. मोबाईल मधलं शुटींग मिळालं. पण त्यात कुठेच MP चा मुलगा नव्हता. तो त्यावेळी फॉरेनला होता असं कोर्टात सिध्द झालं आणि तो सुटला. बाकीच्या तिघांनाही त्या MP नी नावाजलेले वकिल दिले. त्यांची केस चालू होती. पण वकिलांच्या कृपेने फक्त काही अटी आणि काही लाख रुपयांच्या जामिनावर ते जेल मधे न जाता परत समाजात मिसळले. आता वर्षानूवर्षे केस चालणार होती. जनता सर्व विसरणार होती. शिवानीचे सामान्य आई बडील कोर्टाच्या तारखांना हजर रहाणार होते....
दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निकाल सेलिब्रेट करायला ते बार मधे जाऊन दारू पित बसले. रात्री बार बंद झाल्यावर ते घरी जायला निघाले.( त्यांना आपण 1,2,3,4 अशी नाव देऊ. 1. नंबर MP पुत्र ) 2 आणि 3 नंबर बाईक वरून घरी जात होते. एवढ्या रात्री रस्ता तसा निर्जन होता. दोन रोड लाईटच्या मधली एक लाईट बंद होती. थोडासा अंधार होता. आणि कुणीतरी मधेच रस्त्यावर बसलं होतं. यांनी लांबूनच हॉर्न वाजवला. तो एेकून ती उठली . तो पर्यंत ते 5...6 फुट जवळ आले होते .ती हळूहळू त्यांच्या कडे वळली......तिने; मान वर केली ....... ती रक्तबंबाळ शिवानी होती...... त्या दोघांची पाचावर धारण बसली. फुल स्पिडने; ते बाईक पळवत होते पण काही अंतरावर त्यांना रस्ता अडवून बसलेल्या बायका दिसल्या. दृष्टीच्या टप्प्यात आल्यावर त्यांना त्या आपल्या घरातल्याच बायका आहेत हे कळलं. पण त्यांची अवस्था अत्याचार झालेल्या शिवानी सारखी होती. सगळ्या जखमी, रक्ताळलेल्या , जेमतेम एक आेढणी गुंडाळलेल्या, विव्हळणा-या, गयावया करणाऱ्या , भेसूर रडणा-या बायका म्हणजे त्यांच्या बहिणी , वहिनी ,आई ,आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्स होत्या. त्या उठून पुढे पुढे येऊ लागल्या. ते प्रचंड घाबरले. बाईक रिव्हर्स ला घेऊन सुसाट पळण्याच्या नादात बाईक डिव्हायडर वर चढली आणि मोठा अॅक्सिडेंट झाला .ते शुद्धीत आले तेंव्हा हॉस्पिटल मधे होते. नं 2 बाईक चालवत असल्याने हेल्मेट घालून होता. म्हणून फक्त डोकं सुरक्षित राहिलं. त्याचा मणका आणि बरीचशी हाडं तुटली होती. कंबरेच्या खालून तो आयुष्यभरासाठी लुळा झाला होता. यापुढे कंबरेखालचे अवयव तो कधीच वापरू शकणार नव्हता . आणि शिवानी तो जिवंत असे पर्यंत त्याला छळणार होती.
नंबर 3 ही खूप जखमी झाला आणि त्याचं डोक फुटलं. तो कोमात गेला. त्याच्या जखमा भरल्या. मोडलेली हाड सांधली. दोन महिन्यांनी तो शुद्धीत आला. पण त्याचे डोळे गेले होते. हॉस्पिटल मधून घरी गेल्याला एक आठवडाही नव्हता झाला त्याला वेड्यांच्या दवाखान्यात भरती करावं लागलं. कारण त्याला बंद डोळ्याआड सतत तोच प्रसंग दिसत रही. जसा त्याने मोबाईल मधे शूट केला होता. त्या पुढला, शिवानी सरपटत रररपटत जाऊन वरून उडी मारे पर्यंत सतत दिसणारी ही दृष्य त्याचा मेंदू ( विकृत असूनही) सहन करू शकला नाही. तो ठार वेडा झाला. अजूनही तो हे सर्व असायलम मधे भोगतोय.
एक दिवस नंबर चार रात्री घरी आला. घरच्च्यांची झोपमोड नको म्हणून त्यांनी लॅच की ने दरवाजा उघडला. आपल्या रूम मधे जाण्या साठी जीना चढताना त्याला हॉल मधे कुणीतरी आहे असं वाटलं. त्यानी नीट बघितलं तर त्याला तशा अंधारातही समजलं ती कोण आहे..... धावत धापा टाकत तो त्याच्या बेडरूम मधे शिरला आणि दार लाऊन घेतलं. धाप कमी झाल्यावर त्यांने; लाईट लावले आणि ........त्याच्या बेडवर रक्तामधे बरबटलेली शिवानी शून्यात; बघत हमसून हमसून रडत बसलेली त्याला दिसली. तो खोली बाहेर आला तर खाली जिन्यावरून सरपटत तीच; वर येत होती. तो जीव घेऊन वरच्या मजल्यावर गेला. तिथे; समोरच्या बेडरूम मधे त्याची वहिनी; उभी होती. याला थोडा धीर आला. पण आता वहिनीचीच शिवानी होऊ लागली. पांढ-या शुभ्र डोळ्यांतून त्याच्याकडे बघत गरगर मान फिरवत हात पसरून ती पढे पुढे येऊ लागली. तो गच्चीत पोचला. मागोमाग शिवानी होतीच. गच्चीचा कठडा आल्यावर त्याला थांबावच लागलं. पण ती हसत हसत पुढेच येत राहिली. त्याचं डोकं काम करेनासं झालं. घाबरुन तो कठड्यावर चढला. आणि शेवटी तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. खाली अर्धवट बांधकामाच्या उभ्या लोखंडी सळया होत्या. तो इतक्या जोरात वरून खाली आला की त्याचं शरीर आरपार त्या सळयांमधे अोवलं गेलं. लगेच मरण आलं नाही त्याला. रात्रभर वेदनांनी तडफडून तडफडून मेला तो. आणि उरलेले दोघे ( नंबर2 आणि 3 )जिवंतपणी मरण यातना भोगतायत.
नंबर एक आनंदात होता. कारण त्याला शिवानीने काहीच केलं नव्हतं. तो स्वतःला खरोखरच निरपराध मानू लागला. त्याच्या मित्रांच्या बाबतीत घडलेल्या घटनांनी तो मनातून घाबरला होता. त्याच्या वडिलांनी त्याला दिल्लीच्या घरी रहायला नेले. ( ते MP असल्यामुळे जास्त वेळ तिथेच असत.) त्याला तिथे; अोळखीवर एका मोठ्या फर्म मधे नोकरीला लावलं. तो तिथल्या एका डीपार्टमेंटचा मॅनेजर होता. एकूण तो मजेत होता. त्याच महिन्यात त्यांच्या आॉफिसमधे रिसेप्शनिस्ट म्हणून सारीका मेहरा आली. अतिशय सुंदर , हिंदी इंग्लिश आणि फ्रेंच भाषांवर तीचं प्रभुत्व होतं. ती फार कुणाशी बोलायची नाही. स्वतच्या स्कोडा मधून आॅफिसला यायची. ब्रॅंडेड कपडे ब्रॅंडेड पर्स वगैरे बघून ती कोणातरी श्रीमंताची मुलगी टाईमपास म्हणून कामाला येतेय अशी अॉफिसमधे कुजबूज होती. नं. 1 हात धुवून तिच्या मागे लागला. शेवटी दोन महिन्यांनी ती त्याच्याशी बोलायला लागली. हळूहळू ते प्रेमात पडले. तिने आपल्याला चांगलं म्हणावं, सोडून जाऊनये म्हणून तो सुधारला. तिचे आई वडील काही वर्षांपूर्वी कार अॅक्सिडेंट मधे वारले होते. आता त्यांच्या प्रचंड प्रॉपर्टीची ही एकमेव वारस होती. MP कडून लग्नाला लगेच परवानगी मिळाली . कारण त्यांच्या नालायक मुलाला सारीकानेच; सुधारलं होतं ना. मुंबईत धूमधडाक्यात त्यांच लग्न झालं. आधी गावाला जाऊन देवदर्शन घेऊन मग ते स्वित्झर्लंड मधे हानिमूनला जाणार होते. गावाला पोहोचायला संध्याकाळचे सात वाजले. त्यांचा जुना प्रशस्त वाडा होता. तिथे कायम एक म्हातारा आणि त्याचा मुलगा आणि सून कामाला होते. बाहेर सरव्हंट क्वॉर्टर मधे रहायचे. त्या सूनेने मस्त चविष्ट जेवण बनवलं. जेवल्यावर त्यांनी त्या तिघांना सकाळी या असं सांगून पाठवलं. ते पण हसत हसत गेले.
'पहिल्या रात्री' साठी तो अगदी अधिर झाला होता. कारण तिने; लग्नाआधी त्याला फार जवळ येऊ दिलं नव्हतं. खरंतर घरच्यांनी आधी देव दर्शन घ्यायला सांगितलं होतं. पण त्यांने तिला; ते सांगितलं नव्हतं . ( तिला; मराठी बिलकूल कळत नव्हतं याचा फायदा झाला त्याला ) वरची त्यांची बेडरूम फुलानी छान सजवली होती. आधी सारीका आंघोळ करायला गेली. आंघोळ करून ती बाथरूम बाहेर आली. तिने; अगदी झीरझीरीत गाऊन घातला होता. त्यातून दिसणाऱ तिचं; आरस्पानी अंगप्रत्यांग बघून हा कमालीचा उतावीळ झाला. पण तिने; त्याला लटक्या रागाने बाथरूम मधे ढकललं. कशीतरी भरभर आंघोळ आटपून तो बाहेर आला. खोलीत सारीका नव्हती . त्याने कपडे घातले आणि तिला; हाका मारल्या. वरती ती दिसली नाही म्हणून तो खाली निघाला. तेवढ्यात त्याला जोरात सारीकाची किंकाळी एेकू आली. त्याने; आत जाऊन स्वतः च पिस्तूल घेतलं आणि धाडधाड जीने उतरून तो आवाजाच्या दिशेने निघाला. सारीका आता "बचाओ , मुझे जाने दो "असं गयावया करत बोलत होती. त्याने; खोलीच दार एका लाथेत उघडलं आणि अंधुक उजेडात आत बघितलं तर चार नराधम सारीकावर तुटून पडले होते. त्यांनी गोळी मारली पण ती जशी काही हवेत विरली. त्यानी खोलीतला लाईट लावला. आणि त्याच्या लक्षात आलं अरे हे तर आपणच चार मित्र आहोत. ज्यातला एक मेलाय आणि दोघं जिवंतपणी मरण भोगतायत. ते सारीकावर अत्याचार करत होते. ती मदत मागत होती आणि तो काहीच करू शकत नव्हता . त्याला सारीकाची दया येत होती. त्या दिवशी शिवानीचा आपण किती अमानवी छळ केला हे त्याला आत्ता कळत होतं. बघता बघता ते चौघं हवेत विरघळून गेले. आणि आता सारीकाची हळूहळू शिवानी झाली. हात पाय बांधलेली , विवस्त्र, जखमी, पूर्ण; अंग रक्तानी माखलेलं. त्याच्या कडे बघत विव्हळणारी शिवानी. त्याला तिची बिलकूल भिती वाटली नाही. त्याला स्वतःची लाज वाटली , पश्चाताप झाला. शिवानीची मनापासून माफी मागून तो बाहेर आला .सोफ्यावर बसला ,कानशीलावर पिस्तूल टेकवली आणि चाप दाबला.........आता उरलेले दोघे मरत नाहीत तो पर्यंत शिवानीला मोक्ष नाही..... अजूनही चुकून रात्री कुणी कॉलेजच्या त्या भागात गेलं तर रडण्याचे ..... सरपटण्याचे किंवा "हेल्प मी" ....."बचाओ" असे आवाज येतात.......
छान भयकथा लेखन, एक चांगला प्रयत्न
ReplyDelete