गोष्ठ एका पिऱ्याची...
Marathi Horror Katha / Marathi Bhay Katha
गोष्ठ एका पिऱ्याची...
मी आज तुमच्यासाठी माझ्या वडीलांनी सांगितलेला एक खरा खुरा किस्सा सादर करत आहे भूतं प्रेत आत्मा वाईट शक्ती ह्या सर्व गोष्टी असतात किंव्वा नसतात हा मोठा वादाचा मुद्दा आहे. काही विश्वास ठेवणारे सापडतात तर काही मनाचे भास अंधश्रद्धा वैगेरे म्हणतात. पण म्हणतात ना किस्मत खराब हो तो उंट पर भी कुत्ता काटलेता हे तसेच आपले ग्रह वाईट असेल आणि वाईट वेळी वाईट ठिकाणी वाईट शक्तींच्या कचाट्यात चांगल्या प्रकारे फसतो मग आपल्या बुद्धीला न पटणाऱ्या आकलना पलिकडच्या अविश्वसनीय प्रसंग घडतात असच काहीस घडलं शांताराम पडोळे व मनोहर मने ह्या तिशीतल्या तरुणानं सोबत दोगेही रेल्वेत काम करणारे परस्परांचे सहकर्मी हुषार चांगले मित्र साधारण ऐंशी च्या दशकातील गोष्ट दोघी मित्रांच्ची बदली रोह्याला झाली मित्राची साथ आणि कुठे तरी नवीन ठिकाणी रहायला भेटणार म्हणून दोघेही मनोमन आनंदीच होते आणि थोडी बढतीही भेटली होती त्याचा आनंदच वेगळा होता पण घड्याळाच्या काट्या प्रमाणे कशे जुळून येणार आणि घड्याळाचा सारखेच कशे बारा वाजणार ह्याची तिळमात्र कल्पना दोघांना हि नव्हती मोठा प्रवसाच टप्पा पार करून ते दोघें साधारणतः रन रनत्या उन्हांत तीन ते चार च्या दरम्यान रोह्याला पोहोचले स्थानकावर सर्वत्र अगदी भकास वातावरण होते एकदम स्मशान शांतता पसरलेली दूर दूर पर्यंत चिट पाखरू हि नजरेस पडत नव्हते तरीही हि शांताराम व मनोहर ने एकदाचे पोहोचलो म्हणून सुटकेचा दीर्घ स्वास सोडला थोडं वेड वाकडं होऊन प्रवासात आकडलेल अंग मोकळं केलं ऑफिस कोरटर्स थोडं लांब असल्या मुळे त्यांनी ऑफिस जवळ राहण्याची सोया पाहायचं ठरवलं स्थानकावर एका कोपर्यात एक मळकट कळकट रसवंती दिसली खोली शोधायची घाई असली तरी उन्हा मुळे घश्याला कोरड पडली होतीच आणि माहिती मिळवल्या शिवाय निघणार तरी कोठे झप झप पावले उचलत शांताराम व मनोहर रसवंती जवळ पोहोचले ठेवल्याला बाकावर बसले साधारणतः साठी सत्तरीतील म्हातारा असेल ह्यांनी बोलण्या पूर्वीच त्याने दोन उसाच्या रसाचे ग्लास आणून ठेवले व काहीच न बोलता आपल्या कमला लागला रसाचे दोन घोट पीत मनोहर इकडं तिकडच्या गप्पा मारता मारता त्या बाबांना हि चर्चेत सामील करून केव्हा घेतलं ते बाबालाही कळलं नाही पण काम झालं होत जागेची माहिती मिळाली होती तीही ऑफिस च्या जवळ स्टॉप पासून एक ते दीड मैलावर गावात पोलीस पाटलांचा वाडा होता तिथे राहायची सोय होणार होती दोगेही निघाले तडक जाऊन पोलीस पाटलाला भेटले त्यानेही स्वखुषीने त्यांना तिथे रहाण्यास परवानगी दिली व लागलीच त्यांच्या सोबत त्यांची वाड्यावर सोय करून द्याय साठी निघाला संध्याकाळ होत आली होती पण तरी देखीलस्थ स्थानकं व गाव ह्यांच्यातील फरक (वातावरण ) पर असं प्रकर्षाने जाणवत होता
पाटलाचा वाडा अगदी भव्य दिव्य लाकडी चिरेबंदीत बनलेला काहीसा जुनाट पण राजेशाही थाटात उभा असल्यागत उभा गाव वस्तीच्या थोडा अलीकडेच पुढे भव्य या आंगण पटांगण च म्हणावं मळ्यात वसलेला असो शांताराम व मनोहर जाम थकलेले होते आणि भूक हि सपाटून लागलेली होती पोलीस पाटलांनी जवळ राहणाऱ्या गड्याला बोलावले त्यांची सोय करावयास सांगून पाटलांनी निरोप घेतला गड्याने मनोहर व शांताराम ला रूम दाखवल्या वाड्याचा परिचय करून दिला व जेवणाची विचारपूस केली पण दिवसभराच्या दगदग व प्रवासा मुळे त्यांना कसलीच इच्छा नाव्हती शिवाय शिदोरी देखील हाताशी होती कधी एकदाचे दोन घास गिळून पाठ टेकवू असे झालें होते गड्याला नकारार्थी इशारा करून निरोप दिला बाकी पाटलांचा वाडा म्हणजे भव्य दिव्व्य वैभवाच प्रतीक लाकडी चिरेबंदीत उभारलेला अति सुरेख कोरीव काम दोघे हौदावर तोंड हात धुवून थोडे फ्रेश झालें शिदोरी सोडली
थंड गरम जस तस दोन दोन घास गिळले दोघे झोपण्यास गेले झोपण्याची व्यवस्था वरच्या माडीवर होती मोठी खोली वर लाकडी मोठ्या खिडक्या वरती काही फोटो लावलेले जमिनीवर अंग टाकून अंथरून टाकून दोघे पडले लवकरच डोळा लागला दोघेही गाड झोपी गेले होते साधारणतः मध्य रात्र झाली असावी शांताराम ला लघवीला लागली डोळे उघडले किर्रर्र काळोख होता एक भयाण शांतता त्याने मनोहर ला उठवला पण दोघांची खाली जाऊन मोकळ व्हायची हिम्मत होई ना शेवट त्यांची नजर खिडकीत गेली शब्द हि न पुट पुटता दोघांच्या मनात एकच विचार आला शांताराम ने खिडकी उघडली आणि इथंच गाडी चुकली खिडकीतूनच शांताराम ने कामगिरी बजावली खिडकीची दोन्ही कवाड ओढून घेतली आणि जमिनीला पाठ लावतो न लावतो तोच खिडकीचे धडा धड परस्परांवर आदळू लागली सोसाट्याचा वारा सुटला आणि धाडकन खिडकी ची तावदाने उघडली दोघे हि खडबडून जागे झालें काळीज धस्स झालं त्या उघड्या खिडकीतून धूर येऊ लागला व हळू हळू त्या धुराचे एका आकृती मध्ये रूपांतर होत होते दोघे हि उघड्या डोळ्यांनी पाहत होते अक्षरशः काळीज हातात यायची वेळ अली होती ती आता पूर्ण आकृती तयार झाली होती एखाद्या मुस्लिम पीर किव्वा मौलवी ची असावी लालबुंद डोळे वटारून रागाने ह्यांच्या कडे पाहत होती ह्यांची तर भीतीने चाळण उडाली होती म्हणतात न आगे से गिली और पीछेसे पिली व्हायची वेळ अली होती आकृती स्पष्ट होत होती आणि ह्यांच्याकडे त्वेषाने पाहत होती सर्व सम्पल्यागत वाटत होत दोघांची दातखिळीच बसली होती पण दोघांची पूर्व पुण्याई म्हणा किंवा त्या वाड्यातील दैवी शक्ती म्हणा वरच टांगलेल्या फोटो पैकी एका फोटोतून एक सफेद वस्त्र परिधान केलेली स्त्री कदाचित देवी असावी बाहेर आली ती आकृती अजूनही दोघांकडे त्वेषाने खाऊ का जाऊ या अवीर भावाने पाहत होती हे दोघे तशेच भीतीने चाळा चाळा कपात होते आता ती स्त्री हात जोडून त्या मौलवीला पीराला काहीतरी विनंती गत करत होती ह्यांच्या कडे इशारा करू करू काहीतरी संभाषण चालू होत थोड्या वेळात त्या स्त्री कडे पाहत त्या दोघांकडे रागाने पाहत ती आकृती हळ हळू खिडकी पार जाऊन नाहीशी झाली क्षणभर पूर्वीच वादळ आता शांत झालं होते ती स्त्री हि जणू ह्यांना आश्वस्थ करून पुन्हा फोटोत स्तब्ध झाली होती ह्यांची मात्र जाम टरकली होती जन्माची आठवण पडली होती नंतर असं लक्षात आलं कि वाड्याचा मागं बरोबर खिडकी खाली एका पिराची कबर होती आणि नकळत शांताराम ने त्यावर लघवी केली होती म्हणून हा प्रकार घडला होता
मस्त जोक
ReplyDelete