तळघर एका पिशाच्याचा वावर-Horror Story in Marathi


तळघर एका पिशाच्याचा वावर-Horror Story in Marathi

चार मित्र सुट्टी घालवायला हिल स्टेशन च्या दिशेने रवाना होतात. शहर मागे पडल्यावर मार्ग सुनसान होत जातो. आजु बाजुला जंगल आणी डोंगर दर्‍यानी रस्ता वेढला जातो. असाच प्रवास करत असताना वाटेत संध्याकाळ होते.. सुर्य मावळतीला येतो. पण त्याची सफर जारी असते. आता विश्रांती करावी आणी रात्रीचा प्रवास नको म्हणुन ते मित्र रात्रीच्या सोईसाठी जागा शोधत असतात. पण त्या निर्मनुष्य जंगलातच्या रस्ताने कोणताच रेस्ट हाउस होटेल दिसत नसत.... गाडित धिंगाणा चालु होता मजा मस्ती आणि म्युजिक यामधेच त्याना वेळच भान राहिल नाहि. रात्र अजुन गडत होत चालली होती. ते नक्की कुठेयत कि रस्ता चुकले हेच त्याना कळत नव्हत.
सरव जण पहिल्यांदाच प्रवास करत असल्याने त्याना काहिच अनुभव नव्हता रस्ते ठिकाणे त्याना काहि माहित नव्हती.
तरी भरधाव खाली रस्तावर गाडी पळवत होते. आजुबाजुला दाट झाडी आणि काळोख हवा सुसाट वाहात होत. असाच प्रवास करत असताना अचानक त्यातल्या एका मित्राला दुरुन एक हवेलि दिसते..त्या सुनसान रस्त्यावर रात्रिच्या अंधारात त्या हवेलीतुन येणारा मंद प्रकाश याच्या कडे त्याच लक्ष वेधत
"एक मिनिट थांब राकेश ति बघ आपल्याला जागा सापडली चल गाडि वळव ... सुजय जोश मधे सांगत होता.
"अरे पण आहे काय ते हॉटेल कि अजुन काय ? 
काहि असेना आपल्याला रात्रीची सोय झाली बस.. चला बघुया ..
त्या पेक्षा आपण गाडितच झोपलो तर सौरभ ने अापली अक्कल पाजळली
एक काम कर तु गाडित झोप आम्ही बघुन येतो. राकेश बोलला
सरव जण हसु लागले ... 
"काहि नको मि नाहि एकटा राहणार चला सोबतच जाउ सामन पण घ्या परत परत यायला नको.
ते मित्र आपली गाडी त्या हवेली च्या दिशेने वळवतात गाडी आता हवेली समोर येते. हवेलीच्या गेट वर साखळी बांधली होती. टाळा नव्हता नुसती कडी होती .. फार जुन्या काळातल्या हवेलीच प्रवेश द्वार वाटात होत..
राकेश धिर करुन गाडितुन खाली उतरतो. गाडिच्या हेडलाईट च्या प्रकाशात तो गेट जवळ जातो आणी मित्राना अंगढा दाखुन इशारा करतो कि त्या गेटला टाळ नाहि आहे ...तो लागलिच गेट च्या कडिवरची साखळी दुर करु लागतो...आणि आपल्या मित्राना हाक मारतो तसे बाकी मित्र लागलिच गाडितुन उतरुन त्याच्या मदतिला येतात सुजय राकेश ला साखळी काडण्यात मदत करत होता रवी आणी सौरभ त्याना पहात होते.
"मला वाटत कि ही एखादी भयानक हवेली असावी बघा मला तर बघुनच शहारा येतो .. सौरभ घाबरत बोलला
तु गप रे आधिपासुनच पनवती लाउ नकोस...
चला रे मित्रानो आपल्या बॅगा घ्या आनि टोर्च आणा 
राकेश ने गेटची कडी उघडली आणि गेटचा दरवाजा ढकलला तस कर्र र र र असा आवाज आला सौरभ ने घाबरत विचारल आत जाण गरजेचच आहे का ? 
हो.... आत कोणिना कोणी असेलच हवेलीत इतका प्रकाश आहे. 
फार जुनी हवेली वाटतेय आपल्याला रात्री पुरता तरी आसरा झाला तरी बस आहे.
राकेश बोलला .
ठिक आहे चला आत सर्व मिळुन जाउ बघु काय होत गाडितल आपल सामान आणी बॅटरी घ्या ....
ते सरव मित्र हवेलीच्या गेट मधुन आत प्रवेश करतात हवेलीच्या आस पास जुन्या ब्रिटिशांच्या काळातले स्ट्रिट लॅंप मंद पेटत होते त्या उजेडात हवेलीची भिंत भयाण रुप धारण करुन होती. 
राकेश ने हवेली वर बॅटरी मारली ति खुप प्रशस्त होती आणी सुंदर हि पण त्याच्या वर धुळीची चादर होती दोन मजला हवेलीची बनावट खुप जुनी होती पण ति भग्न अवस्थेत होती.
आता सरव मित्र हवेलीच्या गेट मधुन मुख्य प्रवेश द्वाराजवळ पोचले 
दरवाजा आतुन बंद होता रवीने 
दरवाजावर थाप मारली... 
कोणी आहे का ...? काहिच उत्तर आले नाहि 
सरव जण आळी पाळीने दरवाजा ठोकत आवाज देत होते पण दरवाजा काहि उघडत नव्हता .
आत कोणी अाहे कि नाहि यावर आता संक्षय येउ लागला 
तसे राकेश ने हिम्मत करुन दरवाजा वर खांदा मारुन ढकलायला सुरवात केली आणि काहि वेळातच ताडकन तो उघडला... 
धाड करुन आवाज आला 
आतल्या बाजुने कडी निखळुन पडली होती राकेश त्या धक्क्या सकट हवेली च्या दरवाजातुन आत पडला आणि अचानक समोरच दृश्य पाहुन तो भितिने अोरडला बाहेर चे बाकि तिन मित्र लागलिच आत शिरले आणि राकेश कडे पाहु लागले 
काय झाल रे कोण आहे आत ???
राकेश ने भितिने थरथरल्या हाताने कोपर‍्यात इशारा केला तिथे एक पुतळा होता हुबेहुब माणसा सारखा राजेशाही पोषाखात डोक्यावर पगडी अंगात राजेशाही वस्त्र होती गळ्यात माळा 
पुतळा हुबेहुब जिवंत माणसा सारखा होता त्याचे डोळे अगदी जिवंत वाटत होते त्याची उंची साधारण माणसा पेक्षा जास्त जवळपास ७ फुट असेल. असा भरदार देह अचानक समोर पाहुन राकेश ची बोबडिच वळली पण तो पुतळा असल्याची खातर जमा झाल्यावर सरवांच्या जिवात जिव अाला आणि सरव ऐकमेकांची चेष्टा करत हसु लागले.
सरव जण त्या पुतळ्याला न्याहाळत होते गोल गोल फिरुन त्याची तारीफ करत होेते याला साफ करायची गरज आहे आपण याला आपल्या सोबत नेउ रवि चेष्टा करु लागला
"आधी स्वताच्या रहाण्याच बघा मग त्याला न्या सुजय ने रविला फटकारले... तसे सरव आता हवेलीच्या प्रशस्त वास्तुला पाहु लागले .
आत सरवी कडे कंदिलाचे दिवे मशाली आणि मेणबत्या पेटवल्या होत्या या प्रकाशाने हवेलीला सुंदर रुप दिल होत हवेलीच्या मधोमध झुंबर होता त्यात हि दिवे होते हे सरव पाहिल्यावर सर्वाना आश्चरयाचा धक्का बसला 
या जंगलात जिथे विज पोचु शकत नाहि तिथे येवड्या मशाली कंदिल मेणबत्तया कोणि लावल्या असतिल आणी लावल्या तर लावल्या मग ईथे कोणी उपस्थित का नाहि 
सरव गोंधळात पडले.
हि भुताडकी तर नाहि ना सौरभ ला शंका आली 
नको रे या पेक्षा ना आपण गाडितच झोपु मला इथे काहितरी गौडबंगाल दिसतय ... सौरभ उत्तरला
आधी जागा तर पाहुन घेउ ...सुरक्षीत असल्याची खात्री करु मगच ईथे मुक्काम करु बोलत ते हवेली पाहु लागले जुन्या काळातल्या वस्तु भिंतिंवर पेंटिंग्स राजे महाराजांचे स्केच हिंस्त्र प्राण्यांची मुंडकी लावलेली होती. कुर्राड पेटत्या मशाली हि होत्या.
हि हवेली राजे महाराजे काळापासुनची असावी असा अंदाज येत होता वरच्या मजल्या वर जाण्यासाठी नक्षिदार जिने होते मधे हॉल होता आतल्या बाजुला जेवणाची खोली होती तसे ईतरही कक्ष होते ऐखाद्या राजवाड्या सारख वैभव आणि भयाण शांतता होती.
खुप खोल्या होत्या पण रिकाम्या आता क्षयन कक्ष हि होते चला आजच्या दिवसा पुरती साफ सफाई करु आणी ईथेच रात्र काढु रवि बोलल‍ा.

आणि कोण आल तर ????सौरभ ने परत विचारल
आल तर आल बघु घेता येयिल 
मला रात्रिच प्रवास करण योग्य वाटात नाहि मधेच काहि झाल तर मदत मिळणार नाहि त्या पेक्षा सकाळि निघु 
सरवांच एक मत झाल 
त्यानि हवेलीत आपापल सामान आणल आणि ते हवेलीतल्या बंद खोल्या मंधे जागा शोधत होते 
सरवानी आपापली जागा निवडली i
ते हवेलित शोधा शोध करत होते कि काहि उपयोगी वस्तु सापडतात का ते आणी हवेलीतल्या उपयोगी वस्तु त्यानी जमा केल्या.
तस राकेशने जेवणाचा डब्बा खाण्याचे थोडे फार सामान आणले होते ते घेउन जवळच असलेल्या मंचासमोर खुर्च्या लावल्या हवेलीत आल्यामुळे जेवण चालु केले या रहाण्याच्या सोई मुळे सरव जण सुखावले होते आता गप्पा गोष्टी चालु झाल्या कशी बशी पोट पुजा केली रात्रीचे १२;३० झाले होते जेवन उरकली होती मित्र मजा मस्ती चेष्टा करत बसले होते " 
ईतक्यात हवेलीच्या घड्याळ्याचे ठोके वाजले आणि त्याचा आवाज पुर्ण हवेलीत गुंजला रात्रिचा एक वाजला होता.. ठण ठण ठण असे रोमन घड्याळातुन १३ठोके पडले सर्वाना या घडाळ्याचे नवल वाटले.
चला मग हवेलीत फेरफटका मारु तेवडाच टाईमपास मग झोपायला जाउ या हवेलीत काहि खजाना सापडेल का ते पण बघु सुजय हसु लागला.... सरव जण जिने चडुन पहिल्या मजल्यावर पोचले आत चार खोल्या होत्या मोठे शयन कक्ष आणि आत पण कंदिलाचा प्रकाश होता..
सरवाना हेच कळत नव्हत कि हे कंदिल हे मशाली इथे आणल्या कोणि ईथे कोणिच का नाहि हे सरवात मोठ गुढ होत! 
सरव पाहुन झाल्यावर त्याना अप्रुप वाटल खुप जुन्या काळतल सामान होत धुळीने माखलेल पण मौल्यवान तसेच ते खाली आले समोर मधोमध एक मोठा दरवाजा होता त्यावर खुप नक्षी काम होते त्यावर कोळ्याची झाळीही होति जणु तो दरवाजा खुप वरष कोणी उघडलाच नसावा मित्रांनी त्या दरवाजा कडे पाहिले पण त्यावरची धुळ आणि कोळ्याच झाळ बघुन कोणी त्याला हात न लावण्याचा निर्णय घेतला ते सरव जण आपापल्या क्षयन कक्षात जाणारच होते ईतक्यात त्याच दरवाजाच्या आतुन कोणितरी चातल आसल्याचा आवाज झाला .. भरदार बुटांच्या पावलांचा आवाज सरवच जण घाबरले सरवांचे लक्ष आता त्या दरवाजावर होते रविने हिम्मत करुन दरवाजा समोर उभ राहुन आवाज दिला कोण आहे कोण? आहेरे आत ??
तस त्या पावलांचा आवाज थांबला थोडा वेळ 
गेला तसा राकेश ने थांबा मि बघतो बोलत दरवाजा समोरच कोळीष्टक दुर करुन दरवाजा उघडायचा प्रयत्न केला
राकेश ने खाडकतो तो उघडला आत गरमहवा होतीपण आत अंधारच होता "जा ति मश‍ाल आण राकेशने सुजयला सांगितले सौरभ ने हि आपला टोर्च अॉन केला. तेवड्यात परत त्या बुट घालुन चालणा्याच्या आवाजाने सरवांच्या अंगावर काटा उभा राहिलातसे ते धावत अोरडत बाहेर आले 
आत कोणि तरी आहे .... 
कोण आहे तिकडे बाहेर या आम्हाला बोलायचय कोण आहात तुम्ही ??? राकेश ने मोठ्या आवाजात विचारल
पण कोणताहि प्रतिसाद आला नाहि शेवटी राकेश ने परत आत जाण्याचा धाडसि निर्णय घेतला आणि सुजय हि त्याच्या मागोमाग चालु लागला.
आत बघतात तर काय थोड चालल्यावर एक जिना होता पण तो जमिनिच्या आत जात होता आणि त्यातुनच हा चालण्याचा आवाज आला होता कोण असेल तिकडे येवध्या अंधारात मग तो माणुस असेल कि भुत काहि सांगता येत नव्हत पण जर माणुस असेल तर नक्की भेटल पाहिजे ते एक जुन तळघर होत 
मुल धिर करुन त्या तळघरात उतरली आत दाखल झाली मशालीच्या प्रकाशात ते जिन्याची एक एक पायरी खाली उतरत होते आता हे क्लियर झाल होत कि ते एक तळघर आहे आणि यात कोणिना कोणि तरी नक्किच आहे सरवजण एकत्र जमले तळघरात आंधार होता त्यानी बॅटरी टोर्च मशाली च्या सहायाने तातपुरता प्रकाश केला होता सरव जण नजर आत फिरवत होते एकमेकांना धिर देत ते त्या भयाण तळघरात उतरत होते.
ते पायरी उतरुन आत अाले आत खुप सामान होत संदुका होत्या धुळ होती कोळीष्टक होती राकेश मशाली च्या प्रकाशात सरव जागेचा वेध घेत होता ईतक्यात एका माणसाच्या हाडाचा सापळा दिसला ज्याच्यावर कोळ्याने घर केल अचानक ते पाहुन तो दचकलाच आता त्याची भिति वाढत होती. त्याने सरवाना तो मानवि कंकाल दाखवला सरवांच्या मनात एकच शंका येउ लागली कि आपण ईथे येउन मोठि चुक तर केली नाहि ना ???तेवड्यात सुजय च लक्ष एक पेटार्यावर गेलच ति मोठि पेटि होति आणि त्यावर ऐक जोड राजेशाही पदत्राणाचा होता जणु कोणि मुद्दामुन तसे ठेवले असावे हे जुन्याकाळातिल बुट ईथे कसे अस म्हणत राकेश ने मशाल रविच्या हातात देत त्याना हात लावायला गेला पण ते हलत नव्हते जणु ते कोणि घालुन पेटिवर उभा होता राकेशने जोर लावला पण ते जोड त्याला हलवता येत नव्हते मग अचानकच राकेशला जोराचा धक्का लागाला आनी त्यानेे राकेश जोरात ढकलला गेला
राकेश घाबरला अरे कोणितरी उभा आहे या पेटिवर यात कोणि तरी उभा आहे मला ढकलल त्याने तो जोरात अोरडु लागला सरवच जण घाबरले ....मि नाहि हात लावणार सोडा
राकेश पेटिपासुन दुर झाला आणी थरथरत होता यार चला ईथुन मलाहि जागा योग्य वाटत नाहि 
तुला साधे बुटाचे जोड उचलायला येवडा त्रास होतो थांब मि बघतो अस म्हणत सुजय ने सहजपणे ते पेटिवरचे जोड उचलले आणी खाली जमिनिवर टाकले बघितल तुना उगाच आम्हाला घाबरवत होतास राकेश काय आहे या संदुकीत अस म्हणुत सुजय पेटिची कडी उघडु लागला त्याने ति उघडली पण आत मधे काहि नव्हत आणि तस तो ति बंद करणार येवढ्यात त्या लोखंडी पटिच झाकण त्याच्या हातावत पडल आनी त्याची बोट त्यात अडकली "वाचवा मला ....सोडा मेलो रे... करत सुजय जिवाच्या आकांताने अोरडत होता त्याच्या बोटांचा पुरता खिमा झाला कसे बसे त्याने व त्याच्या मित्रांनी जोर लाउन पेटी उघडुन त्याची बोट वाचवली 
आता चला ईथुन निघा लवकर कोणितरी आहे इथे राकेश खरच बोलतोय... तो भितिने कावरा बावरा झाला होता बोटातुन रक्ताची धार आली आनि त्याच्या रक्ताचे थेंब जमिनिवर टप टप पडत होते खरच ईथे काहितरी आहे आपल्याला काहि करण्याच्या आत निघु इथुन मला हि तेच वाटत रवीने न राहुन बोलत होता ईतक्यात पेटिच झाकण परत बंद झाल आनि मोठा आवाज घुमला यात रविच्या हातातिल टोर्च आपोआप बंद पडला आणी सौरभच्या ल हातातुन मशालहि हिसकाउन जमिनिवर फेकली गेली आता जवळपास अंधार झाला सरवानी आरडा अोरड चालु केली ते तळघर आवाजाने गजबजले यात एक अपरिचित आवाज आला कोणी तरी भारी भरकम देह बुटांच्या थाप देत अोरडत तिथुन निघुन गेल्याचा राकेश ने प्रयत्न केला आनी परत त्याने ति मशाल उचलली रवि ने कसाबसा आपला टोर्च शोधला आनी याच गडबडित त्यानि पाहिल कि जमिनिवर रक्ताने माखलेले बुटांचे ठसे लागले होते ते पाहुन सरव घाबरले .. ते तळघराच्या बाहेर हवेलीच्या दिशेने गेल होते सरवानी घाबरतच हवलिच्या आत जाण्यासाठी निघाले
आनी यातच जोरात करकश अोरडण्याचा भरगच्च आवाज आला आत गोंधळाचे वातावरण झाल सरवजण अक्षरछ कापु लागले आनि सरवानी त्या तळ घरातुन बाहेर पडण्यासाठी जिने चडुन धावघेतली
बाहेर पडण्याचाहि दरवाजा बंद झाला होता. आता काय करायच सरव दरवाजा जिवाच्या आकांताने ढकलत होते शेवटि खुप प्रयत्नाने तो दरवाजा उघडला !!! तसा सरवांचा जिवात जिव आला राकेश दरवाजाच्या बाहेर पडला मागुन सरव जण येत होते पण पाहतो तर काय तो पुतळा त्याच्या दिशेने चालत येत होता..त्याला बघुन सर्व परत घाबरुन जिव मुठित घेउन तळघरात घुसले आनी त्यानी दरवाजा लाउन घेतला या गडबडित राकेश बाहेर राहिला 
सरवांचा जोर जोरात श्वासोच्छवास चालु होता आत मरण बाहेर हि मरण आता काय करायच??? बिचारा राकेश बाहेच राहिला पण परत दरवाजा उघडायचा प्रयत्न हि कोण करत नव्हत सुजय रडु लागला 
"अरे हि रडायची वेळ नाहि काहि करायची वेळ आहे रवि त्याला धिर देत होता.
मि तुम्हाला आधिच सांगितल होत कि बघा ईथे काहितरि गडबड आहे तुम्हि माझ ऐकल नाहि आता भोगा आपल्या करमाची फळ सौरभ सरवाना दोश देत होता.
तुला वाटत ना मग मिच काहि करतो
नको नको करत सौरभ ने त्याला खेचल अरे भांडु नकारे हि वेळ आपल्याला ऐकमेकाना साथ देयची आहे रवी बोलला.
तळघरातुन आवाज आला कोणीतरि सारख आत चालत होत..थोडा वेळ तणाव झाला मग भयाण शांतता पसरली आणि अचानक राकेश च्या किंकाळिने ति शांतता भंग केली राकेश च काय झाल बिचारा बाहेर राहिला त्याच्या जिवाच काहि बर वाईट तर झाल नसेल ना आणी आपण दार लावल या विचाराने ते खिन्न झाले
काय करावे कोणालाच काहि सुचत नव्हते रवि ने हळुच काळजि पोटी दरवाजा उघडुन कानोसा घेण्याचा प्रयत्न केला तर बघतो तर काय राकेश समोर नव्हता त्याने दरवाजा खोलला आनी मित्राना तिथेच थांबण्याचा ईशारा केला ईतक्यात जोरात हिसक आरोळी आली तो पुतळा जिवंत झाला होता आणी त्या हवेलीत फिरत होता रविची बोबडिच बसली तो परत तळघरात आला 
अरे बाहेर राकेश नाहि सैतान फिरत आहे ..दरवाजा उघडु नका जिवाच्या आकांताने तो अोरडत होता मला तर हे गुढ काहि उलगडत नाहि ते विचार करत होते पण तळघरात उतरुन खाली जायची हिम्मत कोणात नव्हती तिथुन सारखे आवाज येत होते तळघर किंचाळण्याच्या आणि विव्हळण्याच्या आवाजाने गुंजल होत. कोण कुठुन येयिल काहि समजत नव्हते.
आतुन ते भरदार पावलांचे आवाज येत होते तळघरात जिने उतरुन जाण्याची कोणाची हिम्मत नव्हती. सरव जण देवाच्या धावा करत होते. 
काहि वेळ गेल्यावर परत सर्वत्र परत शुकशुकाट झाला थोडा वेळा साठी सरव जण निवांत बसले होते जोर जोरात श्वासोश्वास चालु होता ईतक्यात परत मोठ्याने अोरडल्याच्या आवाजाने सरव शांतता भंग केली 
बाहेरुन आवाज येत होता दरवाजा जोर जोरात ठोकवला जात होता पण कोणाची हिम्मत नव्हती दरवाजा उघडुन बाहेर येण्याची 
इतक्यात राकेश ने आवाज दिला हराम खोरानो दरवाजा उघडा मि आहे!!!! 
तस सरवांच्या जिवात जिव आला त्यानी दार उघडले पटापट तळघराच्या खोलीतुन ते बाहेर पडले समोर बघतात तर राकेश होता तो थकला होता त्याच्या अंगावर रक्ताचे डाग होते तोंड देखिल रक्ताने माखल होत हातात एक कुह्र‍ाड होती त्याने ति कुराडिला रक्त होते सरवांना संभ्रम होत होता कि हा राकेश आहे कि सैतान पण
राकेशने ने कुराडिने जमिनिवर तुकडे तुकडे पडलेल्या पुतळ्याच्या दिशेने इशारा केला जो त्याने चार पाच घावातच जमिनदोस्त केला होता त्या पुतळ्यातुन रक्त वाहत होते.
"हा पहा सैतान या पुतळ्यात जिवंत झालेला
हाच आपल्याला मारणार होता बर झाल याला मि तोडल मि अशा किति शक्तिंचा वावर या हवेलीत आहे माहित नाहि
पण मला वाचवायला तुमच्या पैकी कोणिच आल नाहि पण मि तुमच्या साठी परत आलो... 
सरवांनी आपापल्या माना खाली घातल्या 
मि माझा जिव वाचवला असता पण पाहिल कि हा पुतळा तुमच्या दिशेने चालत आहे मि जवळच भिंतिवर लटकवलेली कुराडघेतली आणि पहिले याचे मुंडके तोडले हा तरी चालत राहिला याच्या धडातुन रक्ताचा पाट वाहत होता मानेतुनही रक्त उडाले हा परत हालचाल करु नये म्हणुन मि याचे पाय तोडले आणि हा कोसळल्यावर या पुतळ्याचे आणखि दोन भाग केले आनी तसा यातुन काहि प्रकाश बाहेर पडला आणि तुच्या दिशेने गेला म्हणुन च मि त्या मागावर आलो मि याला तळघरातही पाहिल होत पण कोणाला बोललो नाहि कारण तुम्ही खुप घाबराल हा तळघरात एका कोपर्‍यात उभा होता पण याच मुंडक नव्हत मि याची कॉपि पेस्ट केली या पुतळ्याचही मुंडकच छाटल .. आता हा आपल्याला जास्त त्रास देणार नाहि या हवेलीत काळी जादु करुन पिशाच्य पाळुन ठेवलेल आह खुप वाईट शक्तिना ईथे जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे .तेव्हा तुम्ही सावध रहा आनी शक्य तितक्या लवकरच निघा ईथुन
"चला मग ईथुन जाउ आपापल सामान घ्या ते पिशाच्य परत आपल्या मागे लागायच्या आत सौरभ बोलत होता
नाहि अस सहज नाहि राकेश त्वेशाने पेटला होता 
"काय आता काय करणार अाहेस तु ??? 
नको आपल्या जिवाला धोका आहे सुजय समजवत होता आपल्या जखमी हाताकडे पहात 
"असुदे ज्याला कोणला माजा मागे यावस वाटत तर या नाहितर मि एकटा जातो ...
मि सांगतो ते लक्ष देउन ऐका ते पुतळ्याचे तुकडे प्रतेकाने आोढत तळघरात न्या चला लवकर.
ईतक्यात परत तळघराचे दरवाजा बंद झाला तस राकेश ने धावत जाउन त्या दरवाजावर कुराडिने वार केला एक किंकाळी आली दरवाजातुन रक्ताची धार आली राकेश ने मग पायाने लात मारुन दरवाजा उघडला तु आमच काहि बिघडउ शकत नाहिस समजल तो त्वेशाने बोलत होता आनी तसाच तो आत शिरला‍ईतक्यात जोराचा धक्का त्याच्या पाठिला लागला आणि तो जमिनिवर पडला हातातुन कुराड खाली पडली अंधारात काहि दिसत नव्हत सरव मित्र त्या पुतळ्याचे तुकडे घेउन आत आले सुजय ने टोर्च मारला कुराड गायब होती रविने एका हातात मशाल घेतली सरवजण ते तुकडे जमिनीवर फरफटत नेत होते राकेश ने पुतळ्याच मुंडक हातात घेतल होत ते तळघरात पोचले.
ते पिशाच्य पेटिच्या समोर प्रकट झाल काळी उंच आकृती धिप्पाड देह समोर होता लाल लाल डोळे कोणाचा धिर झाला नाहि पण राकेश उठला सर्वच जण घामाघुम झाले घाबरुन थंड पडले राकेश च्या हातातिल मुंडक अचानक जिवंत झाल त्याचे डोळे फिरु लागले ते विचित्र आवाज करु लागल राकेश ने अचानक घाबरुन ते खाली टाकल पण त्याने लागलिच मशालिने त्या मुंडक्याच्या डोळ्याला आग लावली चरर चरर डोळे जळल्याचा आवाज आला तस ति काळी अाकृति गायब झाली 
सरवानी पटापट तळघरात त्या पुतळ्याचे रक्ताने माखलेले तुकडे जमा केले राकेशने जवळच पडलेल्या चादरीत ते जमवले आणि ति संदुक उघडली आणी त्या तुकड्याना आग लाउन ति संदुकित टाकली अरधवट जळालेल्या अवस्थेत त्यानी ति संदुक बंद केली आनी बाहेरुन त्याला कडी लावली तस त्या पेटितुन तडफडण्याची हालचाल होत होति जणु ऐक ऐक तुकड्यात त्या सैतानाचा जिव होता ते सरव संदुकि पासुन दुर झाले सरवानी हा थरारक अनुभव घेतला ते सरव तळघरातुन बाहेर पडत होते इतक्यात रविला ति राजेशाहि पादत्राणे दिसली लागलिच त्याने मशालीने ति पेटवली त्यातुन धुर येउ लागला आनी ति अक्षरक्षा चालु लागले आग लागलेल्या अवस्थेत ते बुट काहि अंतरावर जाउन परत निशप्राण आले 
या त काहि होत मि सांगत होतो ना सौरभ मोठ्याने अोरडत होता
थोडा वेळ जाउ दिला पण आता काहिच हालचाल नव्हती शांति होती सरवा्नी घाई घाईत आपल आपल सामान घेतल आनी ते हवेलीतुन पटापट धावत बाहेर पडले बाहेरचा गेट उघडला अाणि गाडिच्या दिशेने धावले 
सरवांनी हवेली कडे पाहिल तर एक एक करत हवेलितले दिवे प्रकाश पटापट बंद झाले मशाली बुझल्या सर्वत्र अंधारच अंधार झाला झाला त्या हवेलीतुन आता चित्र विचित्र भयानक अोरडन्याचे रडण्याचे विव्हळन्याचे आवाज घूमु लागले आणि ति हवेली काळोखात विलिन झाली. 
ईतक्यात राकेश च्या काहि लक्षात आले आनि तो भितिने जोरात अोरडला 
"अरे थांबा थांबा गाडिच्या चाव्या हवेलीतच राहिल्या........!"
सरवजण भितिने एकमेकांच्या तोंडाकडे पहात होते 
आनी भितिने थंड पडले 
आता एकच प्रश्न त्यांच्या समोर होता त्या हवेलीत परत कोण जाणार ??? 

🌸 समाप्त 🌸

कथा काल्पनिक असुन केवळ मनोरंजन हाच हेतु आहे समाजात अन्नश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतु नाहि 
काहि चुका असल्यास क्षमा असावी 🙏


Comments

Popular posts from this blog

एक होती चेटकीण...

एक सत्य घटना : Marathi Bhay Katha

भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा