पुण्यात या जागी 'रात्रीस खेळ चाले : Marathi Real Ghost Stories

 पुण्यात या जागी 'रात्रीस खेळ चाले : Marathi Real Ghost Stories 

भीती, रहस्य याची उत्सुकता प्रत्येकाला असतेच. अशाच काही अदृश्य शक्तीमुळे चर्चेत असणाऱ्या पुण्यातील काही जागांचा हा मागोवा. या जागांवर काही भीतीदायक अनुभव येतात की नाही याबाबतचे मत वेगळे असेलही पण या जागांची चर्चा मात्र पुण्यातील सर्वाधिक भीतीदायक स्पॉट म्हणून होत असते.

Marathi Ghost Stories

भूत किंवा एखाद्या अदृश्य शक्तिविषयी प्रत्येकाला उत्सुकता असते. या गोष्टी कितपत खऱ्या किंवा खोट्या आहेत याविषयी अजूनही संभ्रम असला तरी काही ठिकाणी अशी रहस्ये आहेत असा ठोस दावा केला जातो. पुण्यातल्या अशाच काही विशेष जागांचा घेतलेला हा आढावा.
शनिवारवाडा : जसा पराक्रमासाठी ओळखला जातो तसाच काही गूढांमुळेही ओळखला जातो. एकेकाळच्या वैभवाची निशाणी सांगणारा शनिवाड्यावर आजही अनेक पर्यटक येत असतात.या वाड्यात आजही रात्री उशिरा किंकाळ्या ऐकू येतात अशी चर्चा असते. शनिवारवाडा कधीही रात्री ८ नंतर बघण्यासाठी खुला ठेवण्यात येत नाही.

Marathi Ghost Story

व्हिक्टरी थिएटर : पुण्यात कॅम्प परिसरात असलेले व्हिक्टरी थिएटर भयंकर भीतीदायक असल्याचे मत काही जण व्यक्त करतात. कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व प्रेक्षक बाहेर जाऊनही आतमध्ये काहीवेळा हसण्याचे आवाज येत असतात असा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे.
kokan ghost stories

सिंहगड किल्ला : इतिहासाची साक्ष देणारा सिंहगड किल्ल्यावरची काही व्यक्तींना अदृश्य शक्तीचे आवाज आले आहेत. काही वर्षांपूर्वी या किल्ल्यावर झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकांचा आवाज दरीतून येत असल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. 

marathi kokan ghost story

होळकर ब्रिज :जुन्या होळकर ब्रिजवर अनेकांना विचित्र अनुभव आले आहेत. त्या पुलावरून मध्यरात्री जाताना अनेकांचा थरकाप उडत असे. या पुलावर झालेल्या अपघातात मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. सध्या मात्र नवा पूल झाल्यामुळे जुन्यापुलावरची वाहतूक कमी झाली आहे.

marathi ghost story

(हा लेख विविध ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीवरून घेतला आहे. या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देण्याचा मानस नाही.) 

ब्लॉग कसा वाटला हे कंमेंट द्वारे कळवा 🙏



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एक होती चेटकीण...

भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा

एक सत्य घटना : Marathi Bhay Katha