Posts

एक होती चेटकीण...

Image
  एक होती चेटकीण- Marathi Ghost Stories  यात तिचा काही दोष नव्हता, असंच कुणालाही वाटलं असतं. पण तिचे हात रक्ताने माखलेले होते. तिच्या ओठांवर पसरलेलं रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या ड्रॅक्यूला प्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा. तिचा तो अवतार भयाण असाच होता. पोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं. तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचा थरकाप उडाला असता. ही दहा वर्षांची चिमुरडी एखाद्या चेटकीणी सारखी भासत होती. तिची नजर अगदी स्तब्ध होती. महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण ती हू नाही की चू नाही. केवळ शून्यात पाहत होती. काय घडलं असेल आदल्या रात्री? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. तिचं नाव शाल्मली. अनूज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या. सविताने शाल्मलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेली नाही. कसंबसं तिने दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला. शाल्मली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे. पण ती शारीरिक आणि मानसिक रितीने सुदृढ आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं ...

मृत्यू योग – Marathi Horror Story

Image
 मृत्यू योग – Marathi Horror Story   फोन ची रिंग वाजली. “अरे यार इतक्या सकाळी कोण फोन करतेय” झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळा नंतर मला जाग आली तसे मी लगेच माझा मोबाईल पहिला. माझ्या मित्राचे म्हणजेच शिवमचे चार पाच मिस्ड कॉल आले होते. तो सहसा असा फोन करत नाही पण काही तरी अर्जंट असावे म्हणून मी पटकन त्याला कॉल बॅक केला आणि कळले की माझा नेट पॅक च संपलाय. माझ्या बाबतीत नेहमी असेच घडते. नेमका आताच मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावतच जाऊन घरातल्या लँडलाईन वरून शिवम ला फोन लावला. मी काही बोलणार तोच तो म्हणाला “हरेश लवकर आपल्या स्टँड वर ये, एम. जे. एम. हॉस्पिटल ला जायचंय”.. ते नाव ऐकून शरीरातून विजेची लहर जावी अशी क्षणीक भीती निर्माण झाली. तुम्हाला वाटेल हॉस्पिटलचे नाव ऐकून घाबरण्यासारखे काय आहे. पण गेल्या काही दिवसात जे काही घडत होतं आणि ऐकायला मिळत होत त्यावरून भीती वाटणं साहजिक होत. काही महिन्यांपासून त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बऱ्याच माणसांचा मृत्यू झाला होता. कारण काहीही असले तरी मृत्यू झालेल्या माणसाची छाती फाडलेली असायची व त्याचे हृदयच नसायचे. अजून...

भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा

Image
 भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा  साधारण दोन वर्षापूर्वी मे महिन्यात मी आणि माझ्या मामाचा मुलगा सिनेमा पाहून रात्री साधारण बारा वाजता घरी येत होतो.. पोर्णिमा होती त्यारात्री.... आमच्या मामाच्या area मध्ये आल्यावर अचानक गार वार सुटला . एवढ्या वाऱ्यात गाडी चालवण जरा धोक्याचाच..म्हणून आम्ही थांबायचा विचार केला . आमच्या मामाच्या area मध्ये जुना वाडा आहे. तो ३० वर्षापासून बंद आहे . आम्ही तिथे बाईक लाऊन बसलो .. त्या वाड्यातून आम्हाला एक बाई येताना दिसली.. तिने पांढरी साडी घातलेली.. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यातून रक्त येत होत. तिच्या डोक्यावर केस नव्हते. ती संपूर्ण टकली होती.. तिचा हा अवतार पाहून आमची जरा टरकलीच ... ती आमच्याकडे पाहून विचित्र हसली..आम्ही खुप घाबरलो. आम्ही बाईक स्टार्ट केली, आणि तिथून पळ काढला. ती आमच्या मागे पाळायला लागली . आम्ही आमची Pulsar full speed वर पळवली . तरीही त्या बाईचा वेग जवळ जवळ आमच्या इतकाच होता.. आम्ही खूप घाबरलो.. त्या स्त्रीने आमच्या घराच्या फाटकापर्यंत आमचा पाठलाग केला.. आणि फाटकावर येउन ती थांबली.. आम्हाला...

पुण्यात या जागी 'रात्रीस खेळ चाले : Marathi Real Ghost Stories

Image
 पुण्यात या जागी 'रात्रीस खेळ चाले : Marathi Real Ghost Stories  भीती, रहस्य याची उत्सुकता प्रत्येकाला असतेच. अशाच काही अदृश्य शक्तीमुळे चर्चेत असणाऱ्या पुण्यातील काही जागांचा हा मागोवा. या जागांवर काही भीतीदायक अनुभव येतात की नाही याबाबतचे मत वेगळे असेलही पण या जागांची चर्चा मात्र पुण्यातील सर्वाधिक भीतीदायक स्पॉट म्हणून होत असते. भूत किंवा एखाद्या अदृश्य शक्तिविषयी प्रत्येकाला उत्सुकता असते. या गोष्टी कितपत खऱ्या किंवा खोट्या आहेत याविषयी अजूनही संभ्रम असला तरी काही ठिकाणी अशी रहस्ये आहेत असा ठोस दावा केला जातो. पुण्यातल्या अशाच काही विशेष जागांचा घेतलेला हा आढावा. शनिवारवाडा : जसा पराक्रमासाठी ओळखला जातो तसाच काही गूढांमुळेही ओळखला जातो. एकेकाळच्या वैभवाची निशाणी सांगणारा शनिवाड्यावर आजही अनेक पर्यटक येत असतात.या वाड्यात आजही रात्री उशिरा किंकाळ्या ऐकू येतात अशी चर्चा असते. शनिवारवाडा कधीही रात्री ८ नंतर बघण्यासाठी खुला ठेवण्यात येत नाही. व्हिक्टरी थिएटर : पुण्यात कॅम्प परिसरात असलेले व्हिक्टरी थिएटर भयंकर भीतीदायक असल्याचे मत काही जण व्यक्त करतात. कार्यक्रम पार पडल...

एक सत्य घटना : Marathi Bhay Katha

Image
Marathi Bhay Katha : एक सत्य घटना  आदिती पराड़कर यांचा हां लेख आहे ........ मुंबई ही स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते. कारण इथे अनेकांची स्वप्नं सत्यात उतरतात. मात्र नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे हिला एक काळी किनारही आहे. म्हणजे ज्या प्रमाणे अनेकांची चांगली स्वप्नं सत्यात उतरतात त्याप्रमाणे कित्येकांची वाईट स्वप्नंदेखील खरी होतात, कित्येकदा अफवादेखील पसरतात. या अफवांतूनच मुंबईतल्या काही भीतीदायक किंवा भयानक जागांचा जन्म झाला आहे. अशा जागा कोणत्या याची आपण ओळख करून घेऊया. मुंबईतल्या चर्चगेट किंवा फोर्टच्या परिसरात कित्येक  कार्यालयं आहेत. बहुतांश कार्यालयं ही ब्रिटिशकालीन इमारतीत आहेत. त्यामुळे संध्याकाळी सातनंतर कार्यालयीन वेळ संपल्यावर या परिसरात शुकशुकाटच असतो. त्यानंतर ब्रिटिशकालीन इमारतींचं रूप भयानक दिसू लागतं. त्यापैकी बॉम्बे हायकोर्टाच्या इमारतीत एक द्विभाषिक भुताचा वास्तव्य असल्याचं मानलं जातं. रात्रीच्या वेळी म्हणे तिथे टाइपरायटर वाजल्याचा आवाज येतो. गेट वे समोरच्या पंचतारांकित ‘ताजमहाल’ हॉटेलच्या बाबतीत अशी आख्यायिका सांगितली जाते की, हॉटेल बांधून झाल्यावर त्या हॉटेलच्...

“अतृप्त आत्मा “ गावाकडच्या भुताच्या गोष्टी

Image
“अतृप्त आत्मा “  गावाकडच्या भुताच्या गोष्टी  Marathi Suspense Stories रुपाली…!! खूप आवडायची मला. ते वयच तसं होत अन ती होतीच इतकी सुंदर कि मला काय, आख्ख्या वर्गाला ती आवडायची. आवडण्यासारखीच होती ती काळेभोर डोळे, जणू प्रेमाचा अथांग डोह. एक वेगळच तेज असायचं त्या डोळ्यांत. लांब सडक केस..!! तीनं त्यांना जणू वाऱ्यावर सोडून दिलं असावं, तरीही ते बिचारे, तिच्याशी ईमान राखून असायचे.सरळसोट, सिल्की आणि शाईन,चेहर्यावर पुढं पुढं करणार्या बटा…!! आपल्या नाजूक हातांनी त्या सावरण्यात, तीचे दिवसातले चोवीस ताससुद्धा खर्ची पडत. लांब नाक…! गोरा रंग…! आणि प्रसन्न चेहरा…!! सदैव ओळखीचं हसू दाखवणारा, नाईन्टीजमधली नीलम आठवतेय का हो तुम्हाला बस..!! अगदी तशीच दिसायची. तिच्या या मोहक अदांनी साहजिकच त्यावेळी चिपळूणमध्ये हार्ट पेशंटची संख्या वाढलेली होती, तरीही.. तिची अन माझी ओळख, निदान तोंडओळख तरी रहायला हवी. अर्थात याउप्पर मला दुसरं काही परवडण्यासारखंही नव्हतं म्हणा. खरं तर आम्ही त्यांचे भाडेकरू. नव्या भैरीच्या पल्याड, त्यांचा एक मोठ्ठा बंगला होता. ant मागच्या बाजूला आऊटहाऊसमधे दोन खोल्या, तिथेच रहायचो आम्...

जळका वाडा - Marathi Bhayanak Story

Image
जळका वाडा- Marathi Bhayanak Story, Marathi Horror Stories भुत भुत आणि फक्त भुतच हो लहानपणापासून मनीषला भुताच्या कथा ऐकण्याची सवय होती. Serials पाहणे त्याला खुप आवडायच. े बघता बघता मनीष मोठा झाला ईजिंनिअरच्या दुस-या वर्षात तो होता पहीली सेमीस्टर झाल्यानतंर लगेच तो फीरायला मित्रांसोबत जाणार होता. तस ठिकाण नक्की नव्हत पण फीरायला जायच हे नक्की होत परीक्षा सपंल्यावर सागंली जिल्ह्यातील माळशेर गाव. गाव तस छान होत लोकसंख्या खुप कमी होती पण निसर्गाने नटलेल होत.. मनीष मित्रांसोबत निघाला आई वडीलांच्या पाया पडून घरातून निघाला सोबत गणपतीची मुर्ती घेऊन निघाला मित्रांसोबत मुलगा पहील्यांदा ईतका लांब निघाला म्हणुन काळजी होतीच आईला. जाता जाता आईला टाटा करुन गेला.. मनीष मित्रांसोबत एका Private गाडीने निघाला खर्च सर्वांनी केला होता. गाडी सकाळी दहा वाजता निघाल्यावर गावात पोहचायला चार पाच वाजले गावात गेल्यावर सर्वांना एक गोष्ट विचीत्र दीसली. सध्यांकाळी सहा वाजता दुकाने बंद करून सर्व लोक आपल्या घरी गेली होती.. मनिषच्या मित्रांना काहीतरी खटकल तिथल्या एका सायकलवरुन येणा-या ...