कोकणातील दवाखाना :- Kokan Marathi Ghost Story
कोकणातील दवाखाना :- Kokan Marathi Ghost Story कोकण म्हटलं की आपल्याला आठवते ते निळाशार समुद्र, आंबा-फणस-नारळ-पोफळीच्या बागा, दरी-खोऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे . त्याचसोबत कोकणात अनेक ठिकाणी आपल्याला काहींना काही गूढ, ऐतिहासिक, काही देवांच्या, काही भुतांच्या अशा गोष्टी ऐकायला मिळतात. नमस्कार मित्रानो!! मी एस. एर. , मी मूळचा कोकणातलाच आहे, लहानपानापासूनच रहस्यमयी कथा ऐकायला मला फार आवडतात. त्यामुळे गावी गेलो की माझ आवडीचं काम म्हणजे एखाद्या अनुभवी व जुण्या-जाणकार लोकांची भेट घेऊन त्यांच्याकडून गावच्या इतिहासाबद्दल, काही जुन्य्या घटनांबद्दल,असाधारण घटनांबद्दल जाणून घेणे. सदर कथा ही मी माझ्या आजीकडून ऐकली आहे. ती लहान असताना ही घटना तिच्या गावच्या शाळेत घडली होती. तर कथेला सुरुवात करतो. भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त ५-६ वर्ष झाले होते. देश स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अगदी जोमाने प्रयत्न करत होता. त्यातच गांधीजींच्या बोलण्यानुसार “जर देशाची प्रगती करायची असेल तर ग्रामीण भागाचा प्रथम विकास करा”, गावोगावी अनेक नवीन योजना राबवण्यात येऊ लागल्या. त्याच योजनेअंतर